spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

भारत मे फिर एक बार “मोदी सरकार” आणण्यासाठी जनताच उत्सुक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

भारत मे फिर एक बार “मोदी सरकार” आणण्यासाठी जनताच उत्सुक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

अक्षराज : धर्मेद्र वर्पे
दि.३०, कराड (सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कराडात विश्वास; सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य उपचार देणार. देशातील कोट्यवधी जनतेने गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कामावर विश्वास दाखवला आहे. २०१३ मध्ये भाजपने प्रधानमंत्री पदासाठी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हा रायगडावर जाऊन मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो होतो. आता शौर्याची भूमी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या साताऱ्याच्या पावनभूमीत नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. साताऱ्यातील जनतेचा जोश उत्साह आणि उमंग पाहून भारत मे फिर एक बार मोदी सरकार.आणण्यासाठी जनताच उत्सुक आहे, आता विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी आमदार नरेंद्र पाटील,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनुप सुर्यवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपचे लोकसभा प्रभारी अतुल भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख मनोज घोरपडे, मच्छिंद्र सकटे,भाजप किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, विक्रांत पाटील, भाजपच्य महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदा जाधव, डॉ.प्रिया महेश शिंदे, ज्ञानदेव रांजणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव रयत क्रांती संघटनेचे सचिन नलावडे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम,शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने,खंडाळा पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत यादव यांची उपस्थिती होती.


नरेंद्र मोदी म्हणाले, मी गेली दहा वर्षे जनतेचा सेवक म्हणून काम करतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे मला अधिक ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे आदर्श विचार जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आजच्या घडीला जी शस्त्रास्त्रे भारतीय सैन्य दलाकडे आहेत. ती सर्व मेड इन इंडिया आहेत. माझ्या या निर्णयामुळे अनेकांची दुकाने बंद झाली. हत्यारांच्या खरेदीतील काँग्रेसची दलाली बंद झाली. सैन्य दलातील जवानांसाठी योजना मोदी सरकारच्या काळात राबवली गेली. काँग्रेस सरकारने याच योजनेसाठी ४० वर्षे सैनिक कुटुंबांना वंचित ठेवले. ५०० करोड रुपयांची तरतूद काँग्रेसला करता आली नाही तीच तरतूद करून मोदी सरकारने एक लाख करोड रुपये माजी सैनिकांना देऊन टाकले.
संपूर्ण देशामध्ये आरोग्य क्षेत्रावर भर दिला. देशातील मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी ५० हजार सिटची मर्यादा होती ती वाढवून एक लाख इतकी केली. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून जनसामान्यांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळत आहे. जनता मोदींच्या पाठीशी असल्याने याची भीती काँग्रेसला आहे. जनतेची लूट करण्यासाठी काँग्रेस पाहत असलेले स्वप्न कधीही सत्यात उतरणार नाही, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी केलेले आरोप.
काँग्रेसची गुलामगिरीत ठेवण्याची मानसिकता
१९४७ साली देश स्वतंत्र झाला, तेव्हापासून काँग्रेसच्या हाती सत्ता होती. काँग्रेसने देशात गुलामीची मानसिकता पसरवली. नौसेनेच्या झेंड्यावर आत्तापर्यंत इंग्रजांचे निशान होते. भाजपची सत्ता आल्यावर हे निशाण झेंड्यावरून हटवले त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकाला स्थान देण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील जनतेला काँग्रेसने अधिकारापासून वंचित ठेवले जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम कायम ठेवून काँग्रेसने या राज्यातील दलित, आदिवासी, ओबीसी या जातींना आपल्या अधिकारापासून वंचित ठेवले जिवंत आहे तोपर्यंत संविधान बदलू देणार नाही कर्नाटक विधानसभेत सत्ता मिळताच काँग्रेसने त्या राज्यातील सर्व मुसलमानांना ओबीसी आरक्षण देऊन टाकले. आता सत्तेवर आल्यास संपूर्ण देशात हा प्रयोग राबवण्याचा विचार काँग्रेस करत आहे. संविधानात बदल करण्याचां विचार काँग्रेसच करत आहे. मात्र मोदी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला हे शक्य होऊ देणार नाही. काँग्रेसकडून समाज माध्यमांचा दुरुपयोग मोदी सरकारने समाज माध्यमांचा उपयोग सरकारचे सर्व कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. मात्र काँग्रेस आणि निवडणुकीच्या काळामध्ये भाजप नेत्यांच्या आवाजात असलेले फेक व्हिडिओ समाज माध्यमावर पसरवून देशातील जनतेत अफवा पसरवू पाहत आहे. हे व्हिडिओ व्हायरल न करता पोलिसांना त्याची माहिती द्यावी. जनतेची संपत्ती काँग्रेस लुटणार काँग्रेस पक्षाने खतरनाक घोषणा केली आहे. प्रत्येक घराघरांमध्ये छापामारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कष्टातून मिळवलेल्या एका लिमिट पेक्षा जास्त संपत्तीवर सरकार हक्क सांगणार आहे.


काँग्रेस सतीच्या काळात धान्याची नासाडी जनतेला अन्नाची गरज होती तेव्हा काँग्रेसच्या सरकारने लाखो टन धान्य सडत ठेवले. मात्र जनतेला ते वाटले नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशही या सरकारने पाळले नाहीत गरीब मेला तरी चालेल पण अन्न देणार नाही अशी असंवेदनशील भूमिका काँग्रेस सरकारने त्या काळात घेतली होती.मोदींच्या घोषणा. मराठा सेनेने ज्या गडकोटांच्या आधारे पराक्रम गाजवला, त्या सिंधुदुर्ग लोहगड तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश हेरिटेज मध्ये व्हावा, यासाठी युनोस्को कडे प्रयास सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यात जनतेचे आरोग्यासाठी ४०० पेक्षा जादा आयुष्यमान केंद्रे तयार केली. ८० टक्के सवलतीच्या दरामध्ये जन औषध केंद्रांवर औषधे मिळत आहेत. कोरोनाच्या काळात मोफत धान्य पुरवठा जनतेला सुरू केला तो इथून पुढच्या पाच वर्षात ठेवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: