वैभव आलिमकर यांची युवासेना दिवा शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती
अक्षराज : विनोद वास्कर
दि. ०४, दिवा (ठाणे) : अखेर युवा शिवसेनेने वैभव आलिमकर यांच्या कामाची दखल घेतली. १३ ते १५ वर्ष युवा शिवसेना मध्ये ते काम करत आले आहेत. अनेक संस्था, मंडळ, संघटना मध्ये ते काम करत आहेत. तरुण तरुणांमध्ये त्यांनी स्वतःची क्रेच निर्माण केली आहे. पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरीक,विधवा महिला, महिला बचत गट, दिव्यांग व्यक्ती, गोरगरीब, विद्यार्थी या सर्वांना मदत करत आले आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार कडून येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ या सर्वांना मिळावा यासाठी सतत प्रयत्न त्यांचा चालू असतो. कोणत्याही जाती धर्माचे नागरिक त्यांच्याकडे कामासाठी गेले तर ते कोणालाही नाही म्हणत नाही. तुमचं काम शंभर टक्के करणार म्हणजे करणार असे गवाई ते देत असतात आणि कामे सुद्धा करत असतात.
वैभव आलिमकर यांची दिवा शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून शिळगाव मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद झाला आहे. राजकीय आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आई-वडिलांना आणि भावाला आणि पत्नीला खूपच आनंद झाला आहे. वैभव आलिमकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे एकदम जवळचे मित्र आहेत. प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्यासोबत असतात.त्यामुळे जनतेची कामेही लवकर होत असतात. वैभव आलिमकर यांच्यावर प्रेम करणारे राजकीय पदअधिकारी, ग्रामस्थ,नातेवाईक,मित्र मंडळी शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गुलदस्ते घेऊन येत आहेत. आणि त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत.