spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

धक्कादायक  ! जन्मदात्या बापाचा मुलाकडूनच खून 

धक्कादायक  ! जन्मदात्या बापाचा मुलाकडूनच खून

अक्षराज : बालाजी गायकवाड

दि.०३ हदगाव (नांदेड) : हदगाव तालुक्यातील मौजे  चिकाळा येथे मंगळवारी रात्रीला मुलानेच बापाचा दगडाने मारहाण करून खून केल्याची घटना घडली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हदगाव तालुक्यातील चिकाला येथील २३ वर्षीय दत्ता मधुकर तूपेकर याने त्याचे वडील मधुकर तुपेकर वय ४८ वर्षे यांना तू माझ्या आईला का मारहाण करतोस म्हणून  मंगळवारी दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री दारू पिऊन येऊन दगडाने मारहाण करून जागीच ठार केले.

यासंदर्भात तामसा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवदास तुगावे यांनी पोलिसाचा ताफा घेऊन घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले. आणि त्यानंतर आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवदास तुगावे हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: