spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अहमदनगरमध्ये कुणाचे पारडे जड ?

अहमदनगरमध्ये कुणाचे पारडे जड ?

शरद पवार आणि राधाकृष्ण विखेंची प्रतिष्ठा पणाला

अक्षराज : वसंत रांधवण
दि.७, अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथील राजकीय लढाईची राज्यभर चर्चा होत असते. महायुतीचे उमेदवार व भाजपचे खा. डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. निलेश लंके यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे नगर दक्षिणेत कुणाचे पारडे जड ? विखे – पाटील गड राखतात की पवारंचा निष्ठावंत ? हि लढाई शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब अशी झाली असून याकडे आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे लंके व त्यांच्या पाठीराख्यांकडून या निवडणूकीला पक्षीय स्वरूपापेक्षा जनशक्ती विरूद्ध धनशक्ती असे स्वरूप देण्यावर भर देत आहे. त्यामुळे विखेंच्या विजयाचे गणित सोपे नसल्याचे चित्र आहे.
पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे विखे कुटुंबासोबतचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे ते पुतण्या अजित पवारांच्या गटात होते तरीही लोकसभेत त्यांना त्यांच्या हाती तुतारी द्यायची,असा चंग शरद पवार यांनी खूप आधीपासून केला होता. त्याबाबत पद्धतशीरपणे खेळी करीत त्यांनी अजित पवार व विखे – पाटील यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मात दिली असल्याची चर्चा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात होती.
अहमदनगरमधील राजकीय समीकरणं पहाता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, संग्राम जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे यावेळी विखेंना गड कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे.


विखे विरूद्ध पवार हा संघर्ष आजचा नाही , तर सुजय विखेंचे आजोबा दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पासूनचा आहे. पवारांनी वेळोवेळी विखेंना शह देण्यासाठी नगरच्या राजकारणात विशेष लक्ष घातलेले पहायला मिळते. त्यांच्यामुळेच मोठ्या विखे – पाटलांनी काहीकाळ शिवसेनेत व्यतित केले होते. तर २०१९ मध्ये काँग्रेस आघाडीमधून नगरची जागा सोडण्यास नकार दिल्यानेच त्यांच्या पुत्र व नातवाला हातात कमळ घेण भाग पडले होते. त्यांचा तो निर्णय सत्ताकारणाच्या दृष्टीने योग्य ठरला होता. भाजपने दोन वेळा खासदार असलेल्या दिलीप गांधी यांच्या बद्दलची मतदारसंघातील नाराजी ओळखून सुजय विखे – पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळी मात्र लंकेबरोबरच भाजपमधील अंतर्गत कलहाशी सामना करावा लागत आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा आहेत. यापैकी ४ राष्ट्रवादी काँग्रेसचे तर २ भाजपचे आमदार आहेत. मात्र येथे विखे पाटील यांना भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू शकतो. विखे कोणत्याही पक्षात असोत, निवडणूक सार्वत्रिक असो की सहकारातील विखे विरूद्ध इतर सारे हे चित्र नेहमीच असते. परंतु यंदा विखे विरोध अधिक संघटित झाला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून झालेल्या पराभवाचे खापर राम शिंदे यांनी विखे कुटुंबीयांवर फोडले होते. तर भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील मागिल काही काळात स्थानिक निवडणुकांमध्ये उघडपणे विखे कुटुंबासमोर आव्हान उभं केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे आणि कोल्हे कुटुंबीयांची समजूत काढीत त्यांना विखेंच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली. मात्र त्यांची मनापासून नाराजी दूर झाली का ? हा एक प्रश्नच आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील सुजय विखे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. हि सुजय विखे यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
निलेश लंकेंची ओळख सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारा नेता अशी आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांचे राज्यभर कौतुक झाले होते. आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना महामारीत कोव्हिड सेंटरमध्ये ठाण मांडून होते.
अहमदनगर मतदारसंघांत विखे – शरद पवारांची प्रतीष्ठा पण. पक्षफुटी आणि गटातटाचं राजकारण याचा फटका कुणाला बसणार यावर विजयाचे समीकरण अवलंबून आहे. अहमदनगरमधील राजकीय सगेसोयऱ्यांची ताकद आणि पाठिंबा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
अहमदनगर मतदारसंघात १९ लाख ८१ हजार ८६६ मतदार आहेत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व ओबीसी बहुजन पार्टीची युती झाली असून दिलिप खेडकर हे उमेदवार आहेत. ते कुणाचे मते घेतात ? यावर देखील विजयी उमेदवाराचे गणित अवलंबून राहणार आहे.

 आ. निलेश लंके यांच्या सकारात्मक बाजू

  • सामान्य,हाडाचा कार्यकर्ता म्हणून जनसामान्यातील प्रतीमा
  • कोविड काळात केलेले मदतकार्य
  • शरद पवार व उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा

नकारात्मक बाजू

  • महायुतीच्या उमेदवाराच्या तुलनेत प्रचार यंत्रणेतील कमतरता
  • अजित पवार गटाकडून होणारा कडवा विरोध
  • वारंवारच्या पक्षांतरबद्दल केला जात असलेला अपप्रचार

 खा. सुजय विखे यांच्या सकारात्मक बाजू

  • पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात केलेली विकासकामे
  • भाजपाच्या श्रेष्ठी बरोबरच शिंदेंची शिवसेना व अजित पवार गटाचा प्रचारात सक्रिय सहभाग
  • विखे – पाटील परिवाराला मानणारा मोठा वर्ग

    नकारात्मक बाजू

  • महाविकास आघाडीकडून जनशक्ती विरूद्ध धनशक्ती असे देण्यात आलेले स्वरूप
  • भाजप अंतर्गत नाराजी व गटबाजी
  • विरोधकांवर खालच्या स्तरावर केलेली वक्तव्ये

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: