मानपाडा पोलीसांची धडाकेबाज कामगिरी ; सराईत गुन्हेगाराना उत्तर प्रदेशातून अटक
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.०७, मानपाडा (ठाणे) : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुन्ह्यातवाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडीस आणण्याकरिता अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे व पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी एक विशेष मोहीम राबवत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्या प्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.निरी विजय कादबाने यांनी मानपाडा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करुन वरिष्ठांनी दिलेले आदेश व सूचनांन प्रमाणे मार्गदर्शन केले सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करत असताना आरोपीबाबत पोनि. राहुल म्हस्के याना बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी प्राप्त होताच सहपोनी संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक उत्तरप्रदेश येथे रवाना झाले व दिवसरात्र एक करुन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. (१) चिंटू चौधरी निशाद वय वर्षे ३५ धंदा बीगारी (२) बबलू उर्फ राजेश बनारसी कहार वाय वर्षे ४० धंदा बिगारी, रा.दिवा,साबेगाव स्मशान भूमी जवळ याचे मुळगाव ग्राम किशुंधर ज्योत पो.मेहू ,ता.बासी,जि. सिधार्थनगर पो.ठाणा गोलरी येथून ताब्यात घेऊन त्याना मानपाडा पोलीस स्टेशन गू.र.नं ६३८/२०२२भादविल कलम ४५४,४५७,३८०,३४ या गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडून ४ घरफोडीचे गुन्हे उघडिस आणले आहेत. सदर अटक आरोपीकडून ३२५.४ग्रॅम वजनाचे दागिने, ०७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा ऐकूण २२,७७,८००/ रू चा एकूण किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अटक केलेले आरोपी हे घरफोडीचे सराईत गुन्हेगार असून मुंबई, नवी मुंबई , व ठाणे आयुक्तालय आरोपित बबलू बनारसी कहर यास १३ गुन्ह्यात व आरोपित चिंटू चौधरी निशाद यास एकूण ७ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी दत्तात्रय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण , सचिन गुंजाळ, पोलीस अप आयुक्त परिमंडळ ३, कल्याण व सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त , डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि विजय कादबाने, पोनि (का व सु) राहुल मस्के, पोनि ( गुन्हे) राम चोपडे, पो नि( प्रशासन) दत्तात्रय गुंड , सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, सपोनि प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर , पोहवा/सुनील पवार, संजू मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील , राजेंद्र खिल्लारे, दीपक गडगे, सोमनाथ टिकेकर. पोना/ गणेश भोईर , शांताराम कसबे, प्रविण किनारे, देवा पवार, येलप्पा पाटील , अनिल घुगे,हासे,चिंतामण कातकडे. पोशि/ विजय आव्हाड, अशोक आहेर,महेंद्र मंजा, नाना चव्हाण , गणेश बडे यांच्या पथकाने केली आहे.