spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

ऐरोलीत २२५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

ऐरोलीत २२५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
महापालिकेच्या विशेष भरारी पथकाची कारवाई

अक्षराज: विनोद वास्कर
दि.०८,नवी मुंबई (ठाणे) : प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर राज्य आणि केंद्र सरकारने बंदी घालूनही काही दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्यांचा मुद्देमाल आढळून येत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली ‘जी’ विभागात ऐरोली सेक्टर ८ ए, येथील एका टेम्पोतून प्लास्टिकची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच पथकाने सोमवारी ६ मे रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास धडक कारवाई केली. टेम्पो चालकाकडून २२५ किलो प्लास्टिक साठा जप्त केला. ५००० रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली.
ऐरोली सेक्टर ८ ए परिसरात काही दुकानदारांना एका टेम्पोतून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याची खबर नवी मुंबई महापालिकेच्या परिमंडळ २ चे डेब्रिज आणि प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाचे लिपिक डी.आर.पाटील यांना सोमवारी ६ मे रोजी पहाटेच्या सुमारास मिळाली होती.

त्यानुसार परिमंडळ २ चे उपायुक्त चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून येथील प्लास्टिकची वाहतूक करणा-या वाहनांवर प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाने पाळत ठेवली. रात्री ८ वाजताच्या सुमारास एका टेम्पोची झडती घेतली असता त्यात २२५ किलो प्लास्टिक साठा आढळून आल्याने मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. प्लास्टिक पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये पर्यावरण प्रदूषण म्हणजेच प्लास्टिक चा वापर करणे पर्यावरणास अपायकारक असल्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार प्लास्टिक विरोधी कारवाईला नवी मुंबईत वेग आला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार परिमंडळ २ चे उपायुक्त चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अभियंता वसंत बाविस्कर, लिपिक डी.आर.पाटील,महेश पाटील,अनिकेत म्हात्रे, वाहन चालक महेश गवारी,सुरक्षा रक्षक रमेश सुर्वे, गणेश शिंदे आणि अच्युत दळवी आदींनी कारवाई केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: