निकालाआधीच पारनेर, श्रीगोंद्यात झळकले उमेदवाराच्या शुभेच्छाचे बॅनर
अक्षराज : वसंत रांधवण
दि.१५, अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी सोमवार दि. १३ मे रोजी मतदान झाले असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या मतदार संपात कोण बाजी मारणार? याबाबत कार्यकत्यांच्या मध्ये अनेक पैजा लागले आहेत. अंश तिच मतांची बेरीज करण्याचं काम सुरू आहे. मतदानाची आकडेवारी लक्षात घेऊन अनेक अंदाज आणि तर्कवितर्क राजकीय नेत्यांकडून ही लावले जात आहे. अशातच आता कार्यकर्ते ही मागे राहिलेला नाही. तथापि उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचा उमेदवार विजयी झाला असल्याचे सांगत अभिनंदनाचे फलक उभारले गेले आहेत. श्रीगोंदा शहरात शनिचौक येथे व पारनेर तालुक्यातील करंदी येथिल मळगंगा देवस्थानच्या कमानी शेजारी खासदार मिळायचा नाय, निलेश लंके साहेंबा सारखा..! साहेब पुढील भावी वाटचालीस हादिक शुभेच्छा आशा अशयाचे बॅनर लावण्यात आला आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली. खरा सामना हा महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे आणि महाविकास अघाडीचे निलेश लंके यांच्यामध्ये होता. गेले महिनाभर प्रचाराची राळ उठली होती. यामुळे या मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला याची चर्चा होत असून त्यावरून पैजाही लागल्या आहेत. समाज माध्यमात आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा केला जात आहे. पण आता समाज माध्यमातील दावे प्रत्यक्ष रस्तोरस्ती दिसू लागले आहेत. श्रीगोंदा शहरातील शनिचौक येथे निलेश लंके यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे, त्यावर त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. देणारा संदेश लिहिण्यात आला आहे. या बॅनरची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.