“बीएसपी” चा बेलापूर विधानसभेत धडाकेबाज प्रचार दौरा
अक्षराज : जे. के. पोळ
दि.१४, नवी मुंबई : बहुजन समाज पार्टीचे २५ ठाणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार संतोष भालेराव यांनी आज नवी मुंबई येथे प्रचाराचा धडाका लावला. सुरुवातीला कोपरखैरणे येथे बसपाचे दिवंगत नेते डब्ल्यू डी थोरात यांच्या जलदान विधी कार्यक्रमा निमित्त त्यांच्या परिवारास भेट दिली. त्यानंतर कोपरखैरणे, बोनकोडे, कोपरी गाव, एपीएमसी मार्केट, तुर्भेगाव हा भाग करून माता रमाबाई नगर बेलापूर, सीबीडी कॉलनी, करावे गाव, सीवूड, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, शिवाजीनगर, आंबेडकर नगर, हनुमान नगर, इंदिरानगर, या ठिकाणी प्रचार करण्यात आला.
लोकसभेचे उमेदवार संतोष भालेराव हे स्वतः प्रचार सभेत उपस्थित होते. त्यांच्यासह नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनीही या प्रचार रॅलीत मोठ्या उत्साहाने सामील होऊन, आपला सहभाग दर्शवून, उमेदवारासोबत फोटो काढून घेतले. स्त्रिया, अबाल-वृद्ध या रॅलीत स्वतःहूनच प्रवेश करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत होते. त्यांना शुभेच्छा देत होते. एक आजीबाई आपल्या नातवाला हत्ती दाखवून जय भीम बोलायला लावत होती. उमेदवाराची तिने आस्थेने विचारपूस करून आशीर्वाद दिले.