spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

वादळी वाऱ्याने वाकस शाळेला दिला तडाखा ; शाळेचे पत्रे उडून नुकसान 

वादळी वाऱ्याने वाकस शाळेला दिला तडाखा ; शाळेचे पत्रे उडून नुकसान 

 

अक्षराज : सतिश पाटील 

दि. १७, कर्जत :  अवकाळी पावसासोबत असलेल्या वादळी वाऱ्याने मागील चार दिवसापासून संपूर्ण कर्जत तालुक्यात हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्याने  तालुक्यातील वाकस शाळेला चांगलाच तडाखा दिला असून शाळेचे संपूर्ण छतावरील पत्रे उडून गेल्याने खूप खूप मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्जत तालुक्यातील वाकस गावात गुरुवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने घरांचे मोठे नुकसान केले  आहे. वाकस, कोळीवली व चोरावले या गावामध्ये देखील वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडाले आहेत. वाकस गावात असलेल्या  डॉ. दत्ता सामंत माध्यमिक शाळेच्या छतावरील संपूर्ण पत्रे उडून समोर असलेल्या मोकळ्या जागेत पडले आहे. तसेच शाळेच्या भिंती देखील कोसळून पडल्या आहेत. त्यासोबत असलेले लोखंडी दरवाजे  खिडक्या हे सर्व खाली पडले आहे. सध्या शाळा बंद असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु शाळेतील सर्व वर्ग खोलीमध्ये पावसाचे पाणी गेल्याने सर्व काही सामान  भिजले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेत शाळेतील सर्व महत्वाचे सामान व  कागदपत्रे योग्य अशा सुरक्षित ठिकाणी हळविण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: