spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर ; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा वावर

निलेश लंके समर्थकांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्ह्यात खळबळ

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२२, अहमदनगर : लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस ईव्हीएम मशीन ठेवलेल्या वखार महामंडळाच्या गोदामा पर्यंत आला आहे,असे म्हणत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट केला होता. मात्र सदरील व्यक्ती सीसीटीव्ही देखभाल दुरुस्ती करणारा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. यावर निलेश लंके यांनी पुन्हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करत जिल्हा प्रशासनाच्या स्पष्टीकरणावर सवाल उपस्थित केला आहे. अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. कुंपणच आता शेत खातय असं म्हणत त्यांनी यासंदर्भात प्रशासनाला धारेवर धरले आहे.

 काय म्हणाले निलेश लंके…

सन्मानीय कलेक्टर साहेब,
सप्रेम नमस्कार,
तुम्ही दिलेल्या या घटनेच्या स्पष्टीकरणाला अनुसरून खास आपल्या अवलोकनार्थ हा दुसरा व्हिडिओ पोस्ट करीत आहे.
व्यवस्थित बघा.
सदर व्यक्ती आत जाते पण बंदोबस्तावर असलेल्या थोडक्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस यंत्रणेलाच याची माहिती नाही. कोण आत गेले, कोण बाहेर आले याची त्यांना खबर नाही.
सदर व्यक्ती सीसीटीव्हीची देखभाल दुरुस्ती करीत असल्याचा दावा केला जात आहे. पण त्या व्यक्तीला कोणता सीसीटीव्ही कोठे आहे याची माहिती नाही.
आत जाणारी व्यक्ती एकटीच गेली. सोबत तर कोणीच दिसत नाही. मग त्याने कोणाचा बंदोबस्त घेतला होता हे सांगता येईल का?
तेथील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेलाही हि व्यक्ती आत गेल्याचे माहित नाही. केवळ तुमच्या तोंडी आदेशाने अशा प्रकारे तेथे कोणालाही कसलीही कल्पना देता ती व्यक्ती शटरपर्यंत कशी काय जाऊ शकते ? आणि जर विशेष पोलीस बंदोबस्तात गेली असेल तर त्याचे फुटेज तुम्ही जिल्हाधिकारी आहात म्हटल्यावर तुमच्याकडे सहज उपलब्ध होतील ते सादर होतील का?
सांगा बरं.

निलेश लंके यांनी केलेली पहिली पोस्ट देखील पहा…

संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्या नगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्यांनी तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही ? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: