मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक, ९३० लोकल रद्द…
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.३०, मुंबई : शुक्रवार, दिनांक ३० मे रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते रविवार, दिनांक २ जूनला दुपारी ३ वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळात एकूण ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तब्बल ६३ तास मेगाब्लॉक असणार आहे.
विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याच मध्य रेल्वेचं आवाहन. तसेच विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवास टाळणे तसेच अत्यावश्यक असल्यास प्रवास करण्याचं रेल्वेचं प्रवाशांना आवाहन देण्यात आले आहे.
– शुक्रवार, दिनांक ३१ मे १६१ गाड्या
– शनिवार, दिनांक ०१ जून ५३४ गाड्या
– रविवार, दिनांक ०२ जून २३५ गाड्या रद्द