spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

शेल्टर असोसिएटस संस्थे मार्फत मासिका महोत्सव साजरा

शेल्टर असोसिएटस संस्थे मार्फत मासिका महोत्सव साजरा

अक्षराज : अनिल कुदळे 

नवी मुंबई : २८ मे हा जगभरात मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो. नवी मुंबई मध्ये शेल्टर असोसिएटस संस्था स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर काम करत आहे. ४ हजार पेक्ष्या जास्त वैयक्तिक शौचालय संस्थेने नवी मुंबई मधील वस्त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आरोग्य विषयात काम करत असताना मासिक पाळी वरती जनजागृती आणि बाजारातील पॅड ला पर्याय म्हणून कापडी पॅड वापर तसेच या पॅडच्या कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर काम वस्त्यामधील महिला सोबत करत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात माझी वसुंधरा ची प्रतिज्ञा स्वच्छता निरीक्षक यांनी नागरिकांना देऊन केली.
28 मे हा जागतिक मासिक पाळी दिन जगभरात साजरा केला जातो याचा एक भाग मासिका महोत्सव हा 11 देशांमध्ये एक आठवडा भर साजरा केला जातो. संस्थे मार्फत नवी मुंबई मधील बेलापूर या ठिकाणी या वर्षीचा मासिका महोत्सव साजरा केला गेला. बेलापूर मधील रमाबाई नगर, संभाजी नगर, दुर्गा माता नगर, राहुल नगर या वस्त्या मधील महिलांनी एकत्र येऊन वस्त्या मधून असणाऱ्या मासिक पाळी या विषयावर असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज हे कमी झाले पाहिजेत. यासाठी विविध खेळाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. स्त्री – पुरुष समानता सोबतच महिलांना नोकरी च्या ठिकाण बरोबर घरातील कामे सुद्धा करायची असतात आणि त्या बरोबर मासिक पाळी च्या दरम्यान सुद्धा महिलांची मानसिक परिस्थिती समजून घ्यायला हवी. या विषयी जनजागृती करण्यात आली. वस्ती मधील १०० मुलांनी मासिक पाळी या विषयावर चित्रकला स्पर्धा मध्ये भाग घेतला होता. त्यांची चित्रे सुद्धा दर्शनी भागात लावली होती आणि उत्कृष्ट आशा चित्र काढणाऱ्या मुलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रम साठी शेल्टर संस्थे WASH प्रकल्प च्या संचालिका धनश्री गुरव, प्रकल्प समन्वयक अमोल गाडे आणि संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते मनीषा सुर्वे, सुनीता सकुंडे, अरविंद राठोड, प्रतीक बनसोडे, ज्ञानेश्वर आढे, मनपा कडून स्वछता निरीक्षक महेश मोरे, अजित तांडेल, आरोग्य विभागाच्या परिचारिका जानव्ही साळवी आणि आशा वर्कर तसेच बेलापूर पोलीस ठाणेच्या निर्भय पथकाचे सहकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: