spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा ४ जून नंतर हिशोब चुकता करणार – निलेश लंके यांचा इशारा

कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा ४ जून नंतर हिशोब चुकता करणार – निलेश लंके यांचा इशारा

विखे – पिता पुत्रास इशारा

अक्षराज : वसंत रांधवण
दि.३०, शेवगाव (अ.नगर) : लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आकसबुद्धीचे राजकारण करून कार्यकर्त्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, ते त्यांनी करू नयेत अन्यथा दि.०४ जून नंतर सर्व हिशब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा इशारा माजी आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी मला मदत केली असल्याने मी सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे.
पैसे कमविण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात काही कमी पडत नाही, मी प्रस्थापितांच्या विरोधात सामन्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे. माझी प्रस्तापितांच्या विरोधात लढाई सुरू आहे.
तसेच सुजय विखे यांचे नाव न घेता लंके म्हणाले लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्या मोठ्या लोकांच्या विरोधात लढणे हे सोपे काम नव्हते, पण जिवाभावाचे सामान्य लोक व सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली असल्याने मोठ्या फरकाने विजय होणार असल्याचे जाहीर सांगितले. त्याचसोबत मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तींनी मदत केली आहे, कोणी कोणी मदत केली, हे आज जाहीर करणार नाही, पण निकालानंतर सर्व कळणार आहे. विरोधकांनी आमच्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जात आहे, पण आम्ही गुंड नाहीत तर गरिबांना छळणाऱ्यांचा बंदोबस्त करून गुंडगिरी थांबविण्यासाठी प्रयत्न केला आहे.

महसूल व पोलीस यंत्रणा कोण चालवतो हे पाहावे लागेल…!

शेवगाव तालुक्यासह मतदारसंघात खतपाणी घालून सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच महसूल व पोलीस यंत्रणा कोण हाताशी धरून चालवतो ते भविष्यात पहावे लागेल तसेच सर्व सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे आवर्जून सांगितले आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकी दरम्यान विखे व लंके यांच्यातील राजकीय संघर्ष नागरिकांनी पाहिला आहे. आता निवडणूक संपल्यानंतर हा संघर्ष देखील संपेल असे वाटत असतानाच लंके यांनी केलेले हे विधान म्हणजे हा संघर्ष या पूढे देखील चालूच राहणार असल्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: