spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

शिळफाटा, कल्याण येथे वाहतूक कोंडी…

शिळफाटा, कल्याण येथे वाहतूक कोंडी…

सर्कल जाम, शिळफाटा उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगा

अक्षराज : विनोद वास्कर
दि.३१, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावर वाहनांच्या रांगच रांगा पहायला मिळत आहे. कल्याण फाटा, शिळफाटा सर्कल वर चारी बाजूंनी ट्राफिक कोंडी होत असल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे. कोटी रुपये खर्च करून सुद्धा वाहन चालकांना येथे दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसून येऊ आहे. नेमकं काय कारण आहे की दररोज सकाळी ट्राफिक कोंडी होत आहे.

वाहतूक शाखेचे अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून टॉपिक कोंडी सोडवावी आणि वाहतूक चालकांना दिलासा द्यावा. अशी सर्व वाहतूक चालकांची विनंती आहे. उद्योग, नोकरदार, वर्ग यांना आपल्या कामासाठी जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे एखाद्याची नोकरी सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे एखाद्याचे कुटुंब रस्त्यावरही येऊ शकतं याची सर्व जिम्मेदारी कोण घेणार? राजकारणी नेते १०  मिनिटांमध्ये नवी मुंबई, मुंब्रा आणि पनवेल भागांमध्ये जाता येणार असे अनेक वेळा थापा मारत असतात. सध्या तरी अशी परिस्थिती नाही आहे. कल्याण फाटा, शिळफाटा वाहतूक कोंडी कधी सुटेल असा प्रश्न या मार्गावर प्रवास करणारे वाहन चालक, प्रवासी करत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: