spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी ! विधानसभेलाही पारनेरच ठरेल लक्षवेधी !

लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी ! विधानसभेलाही पारनेरच ठरेल लक्षवेधी !

अक्षराज : वसंत रांधवण
दि.०१, अहमदनगर : ऑक्टोबर मध्ये साधारण विधानसभेच्या निवडणुका होतील असे अंदाज आता वर्तवण्यात येऊ लागले आहेत. त्यानुसार सर्वच पक्ष व इच्छुक तयारीला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदार संघ असून विधानसभेलाही शक्यतो पारनेर लक्षवेधी ठरेल असे चित्र आहे.
याचे कारण असे की येथे विधानसभेला इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे. त्यात अनेकांना लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात वरिष्ठांनी विधानसभेची पेरणी केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या भाऊगर्दीत सर्वांचीच कसरत होणार आहे. यामध्ये महायुतीकडून उभे राहण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेरमधून महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण राहिल, हा प्रश्न तालुक्यातील सर्व कार्यकर्ते तसेच मतदारांना देखील पडलेला आहे, जो तो आपापल्या परीने आमचाच नेता आमदारकीला उभा राहणार आणि निवडूनही येणार अशा चर्चा सोशल मीडियावर, व्हाट्सअप ग्रुप वर करत आहे.

कोणकोण उमेदवार इच्छुक ?

सध्या महायुतीकडून अनेक इच्छुक उमेदवार दिसत आहेत. यामध्ये सध्या नागरिकांत चर्चा असणारी जी नावे आहेत ती म्हणजे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी सभापती काशिनाथ दाते सर, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे आदी नवे इच्छुकांच्या यादीत आहेत.
त्यात आता माजी आमदार विजय भास्कर औटी यांनी लोकसभेला खा. सुजय विखे यांना पाठिंबा दिला असल्याने त्यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कारवाई केलेली आहे. त्यामुळे आगामी कळत त्यांना तिकिटासाठी महायुतीचा पर्याय निवडावा लागेल अशी चर्चा आहे. तसेच येथे निलेश लंके हे स्टँडिंग आमदार होते. लोकसभेच्या त्यांच्या जय पराजय यावर पुढील त्यांच्या आमदारकीची दिशा ठरेल. तसेच निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या देखील आमदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. लंके समर्थकांकडून भावी आमदार राणीताई निलेश लंके अशा आशयाचे पोस्टर देखील झळकावण्यात आले होते.

 माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे आमदारकीला उभे राहाणारच ?

माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा देखील जनसंपर्क दांडगा आहे. तसेच त्यांनी एकदा काही झालं तरी आमदारकी लढणारच असेही म्हटले होते असल्याचे त्यांचे समर्थक म्हणतात. त्यामुळे ते देखील या लढाईचे स्वरूप पालटू शकतात असेही म्हटले जाते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: