spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

एम.एम.आर डी.ए.चे शून्य नियोजन ; आमदार राजू पाटील यांची टीका !

एम.एम.आर डी.ए.चे शून्य नियोजन ; आमदार राजू पाटील यांची टीका !

अक्षराज : विनोद वास्कर

दि. ०१, कल्याण (ठाणे) : कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एम.एम.आर. डी.ए चे व्यवस्थापक यांना सोशल मीडिया ॲप्स च्या माध्यमातून टिवीट करण्यात आले आहे. डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे.नुकताच कल्याण-शीळ रस्त्याचे कॉंक्रिटीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. आता त्याच्या मधोमध मेट्रॅासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे. खरंतर कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामासाठी संपूर्ण भूसंपादन झालं असताना देखील फक्त कल्याण-शीळ रस्त्यावरच खड्डे खोदण्याचे काम सुरू झालं आहे. मेट्रो आली, काम सुरू झाले, जगाला दिसले व याच काळात लोकसभा निवडणूका पण झाल्या ! आता बस करा की ! मी सतत सांगत आहे,की कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे.

जोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते होत नाहीत तोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्यावरचे सुरू असलेले कल्याण-तळोजा मेट्रॅाचे काम बंद करून या प्रकल्पाचे इतर ठिकाणचे काम सुरू करावे व मधल्या काळात या रस्त्यावरचे पलावा पुल, लोढा प्रिमियर,रूनवाल व अनंतम् येथील जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, व नंतर या रस्त्यावरचे काम सुरू करावे.अन्यथा पावसाळयात जनतेला सद्य स्थिती पेक्षा अधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार व त्यांचे प्रचंड हाल होतील. याला सर्वस्वी MMRDA चे ढिसाळ नियोजन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. असे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: