spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

दिल्ली दरबारात कोणाला मिळणार एंट्री ; उद्या होणार फैसला

दिल्ली दरबारात कोणाला मिळणार एंट्री ; उद्या होणार फैसला

अक्षराज : वसंत रांधवण
दि.०३, अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीत कोण ठरणार बाजीगर ? याबाबत अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात तुफान चर्चा सुरू आहे. अहमदनगर – शिर्डी मतदारसंघच नाही तर अवघ्या राज्यातील उमेदवारांबाबत दावे – प्रतिदावे करण्यात सर्वसामान्य नागरिक व पुढारी मग्न होते. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी असल्याने उद्याच अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघातून दिल्ली दरबारी कोण जाणार ? याचा फैसला उद्या म्हणजेच दि.४ जून रोजीच दुपारपर्यंत होणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालाकडे अहमदनगरकरच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्राचे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे. मंगळवारी, ४ जून रोजी सकाळी ८ पासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ एमआयडीसी, नागापूर येथे अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानुसार मतमोजणी प्रकिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून शासकीय वखार महामंडळ एमआयडीसी नागापूर येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा,अजय कुमार बिस्त,अरुल कुमार तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालिमठ, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर,पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.
यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ चे कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशान्वये मतमोजणी प्रकिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊन एमआयडीसी, नागापूर लगतचे १०० मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास,वाहनांचे आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्यानूसार वखार महामंडळाच्या गोदाम, एमआयडीसी येथिल आतील संपूर्ण परिसरात मोबाईल टॅब्लेट, संगणक व तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास, वापारण्यास,हाताळण्यास प्रतिबंध असणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ,आगपेटी,लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करणे, मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्र व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्ती यांनी मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगून मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे, पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी, कक्षामध्ये मोबाईल व कॅमेरेसह प्रवेश करणे, निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवानाशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करणे,यावर निर्बंध राहतील. निवडणूक आयोगाच्या प्रवेशिका प्राप्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधी यांना शासकीय वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या आतील परिसरातील मिडीया सेंटर पर्यंत मोबाईल व कॅमेरा प्रवेशिकेत नमूद असने आवश्यक, बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा बंदी आदेश मंगळवारी, ४ जून रोजीचे ६ वा. पासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहिल, असेही सांगण्यात आले आहे.

 मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. ३ मध्ये होणार आहे.

 एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबलावर मतमोजणी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर , अहमदनगर शहर, श्रीगोंदा व कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत.

 मतमोजणी फेऱ्या पुढीलप्रमाणे

विधानसभा मतदारसंघ निहाय असणाऱ्या व मतदान केंद्रनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या, संगमनेर २७८ मतदान केंद्र २० फेऱ्या, शिर्डी २७० मतदान केंद्र २० फेऱ्या, कोपरगाव २७२ मतदान केंद्र २० फेऱ्या, श्रीरामपूर ३११ मतदान केंद्र २३ फेऱ्या तर नेवासा २७० मतदान केंद्र २० फेऱ्या होणार आहेत.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, राहुरी ३०७ मतदान केंद्र २२ फेऱ्या पारनेर ३६५ मतदान केंद्र २७ फेऱ्या, अहमदनगर शहर २८८ मतदान केंद्र २१ फेऱ्या, श्रीगोंदा ३४५ मतदान केंद्र २५ फेऱ्या तर कर्जत जामखेड ३५६ मतदान केंद्र २६ फेऱ्या होणार आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: