spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अखेर पारनेरचा पठ्ठ्या खासदार झाला ; निलेश लंकेंच्या पदरात खासदारकी टाकली !

अखेर पारनेरचा पठ्ठ्या खासदार झाला ; निलेश लंकेंच्या पदरात खासदारकी टाकली !

अक्षराज : वसंत रांधवण
दि.४, अहमदनगर : लोकसभेच्या नगर मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत चुरस कायम राहिली. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांना त्यांच्या होमग्राऊंड समजल्या जाणार्‍या पारनेर मतदारसंघातील मतदारांनी भरभरुन साथ दिली. हीच साथ त्यांना निर्णायक ठरली. पारनेरमधून जवळपास पन्नास हजारांपेक्षा अधिकची मते लंके यांना मिळाली. नगर शहरातून जवळपास ३४ हजार मतांचे मताधिक्य सुजय विखे यांना मिळाले. मात्र, पारनेरमधून लंके यांनी मोठे मताधिक्य घेतले आणि हेच मताधिक्य तोडणे विखे यांच्यासाठी जिकीरीचे ठरले. नगर शहरातील मताधिक्यावर मात करत लंके यांनी पारनेरकरांच्या मतांच्या जोरावर विजयश्री खेचून आणली.

 पारनेर तालुक्यातील विखेंच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह !

पारनेर तालुक्यातील विखेंचे सारेच राजकीय पक्षांचे नेते नीलेश लंके यांच्या विरोधात गेले होते. माजी आमदार विजय औटी यांच्यापासून ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजय औटी, बंडू रोहोकले, विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे आदींसह अनेकजण भाजपा उमेदवार सुजय विखे यांच्यासाठी प्रचार करताना दिसले. यातील अनेकांचे एकमेकांशी विळ्याभोपळ्याचे सख्य! एकमेकांना पाण्यात पाहण्यातच यातील काहींनी प्रचार यंत्रणा राबवली. यातील काहीजण स्वत: विखे यांच्या प्रचारात असताना त्यांचे समर्थक मात्र नीलेश लंके यांच्या प्रचारात राहिले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. निकालाच्या आकडेवारीत नीलेश लंके यांना पन्नास हजारांपेक्षा जास्तीची मते मिळाली. गत विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती होती. आता लोकसभा निवडणुकीत सर्व नेते एका बाजूला असताना निलेश लंके यांनी किमया साधत पारनेरचा बाजीगर आपणच असल्याचे दाखवून दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: