spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अखेर दिंडोरीचा गड भगरे सरांनी केला सर..

अखेर दिंडोरीचा गड भगरे सरांनी केला सर..

अक्षराज : निवृत्ती शिंदे
दि.४, नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभेसाठी मागील महिन्यात दि.२० मे रोजी मतदान झाले होते. त्यानंतर आज मंगळवार दि.४ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरु होती. यानंतर आता मतमोजणीनंतर दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर झाला आहे.
यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. त्यामुळे भगरेंनी दिंडोरीचा गड ‘सर’ केला आहे. भगरेंनी डॉ. भारती पवार यांचा तब्बल १ लाख १२ हजार मतांनी पराभव केला आहे. त्यामळे भगरे हे दिंडोरी लोकसभेतून विजयी झाले असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून मविआचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत भगरे यांनी एकूण ५३८०७ मतांपैकी २३ हजार ४४३ इतकी मते मिळवत १ हजार मतांची आघाडी घेतली होती. तर पवार यांना पहिल्या फेरीत २२ हजार १८३ मते मिळाली होती. तर दुसऱ्या फेरीत भगरे यांनी ६ हजार मतांची आघाडी घेतली होती.

याशिवाय सातव्या फेरीत भगरे हे पवार यांच्यापेक्षा १८ हजार ५०२ मतांनी आघाडीवर होते. भगरे यांना सातव्या फेरीत १ लाख ६८ हजार ९३९ मते मिळाली होती. तर भारती पवार यांना १ लाख ५० हजार ४३७ मते मिळाली होती. यानंतर आठव्या फेरीत भास्कर भगरे २३ हजार ६२७ मतांनी तर नवव्या फेरीत भास्कर भगरे २५ हजार मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर भगरे यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे यांच्या नामसाधर्म्य असलेले बाबू भगरे यांना या निवडणुकीत तब्बल 1 लाखाहून अधिक मते घेतली. कदाचित भगरे यांचा विजय काही हजार मतांनी निसटला असता तर भास्कर भगरे हे बाबू भगरे यांना कधीच विसरले नसते.

दिंडोरी मतदार संघात कुणाला किती मते पडली!

भास्कर भगरे (राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट) :५,७७,३३९(४६.५%) विजयी, डॉक्टर भारती पवार (भारतीय जनता पक्ष :४,६४,१४०(३७.४%), बाबू भगरे (अपक्ष) :१,०३,६३२(८.४%), मालती ढोमसे (वंचित बहुजन आघाडी) ३७,१०३(३%), दीपक जगताप अपक्ष):१५६८१(१.३%), तुळशीराम खोटरे (बहुजन समाज पक्ष) :९,६५४(०.८%), किशोर डेंगळे (आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया) :८,०५५(०.६%), अनिल बर्डे (अपक्ष)६,४४१(०.५%), भारत पवार (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष) ५,६२१(०.५%), गुलाब बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) ४,९९८(०.४%), नोटाला ८,२४६ (०.७%) लोकांनी पसंती दर्शवली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: