spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

पारनेरमध्ये खा.निलेश लंके यांच्या समर्थकांवर जीवघेणा हल्ला

पारनेरमध्ये खा.निलेश लंके यांच्या समर्थकांवर जीवघेणा हल्ला

अक्षराज : वसंत रांधवण

दि.०६, पारनेर (अहमदनगर) : लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचा लंके यांनी पराभव केला. या विजयानंतर पारनेर तालुक्यात राजकारण पेटले असून समर्थक आमनेसामने आले आहेत. लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली.

लोकसभा निवडणुकांनंतर पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. लंके यांच्या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्या गाडीवर पारनेर बस स्थानकाजवळ हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले असून या हल्ल्यात राहुल झावरे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लंके समर्थक घटनास्थळी जमा झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: