स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा येथे शिक्षक कार्यशाळा संपन्न
अक्षराज : प्रतिनिधी
दि.०७, बुलडाणा : शिक्षण अभ्यासक्रमामध्ये ‘जीवन विज्ञान पाठ्यक्रमाची आवश्यकता’ याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व स्वामी विवेकानंद आश्रम हिवरा यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक कार्यशाळा” आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, कोकण प्रांत उपाध्यक्षा हेमलता दिलीपसिंग मुनोत,अमरावती विभाग अध्यक्ष राजेंद्र चोथवे, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद थुट्टे, विश्वनाथ सांगळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, परभणी, इत्यादी नऊ जिल्ह्यातील दीडशेहून अधिक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. मुनोत व मुख्यमुनी महावीर कुमारजी यांच्या प्रयत्नाने ५५ हजार किलोमीटर पदयात्रा करणारे आतंरराष्ट्रीय किर्तीचे महान जैन संत आचार्य श्री महाश्रमणजी महाराज व त्यांच्या शिष्य डॉ. आलोक मुनी, योगेश मुनी, चिन्मय मुनी यांनी शिक्षकांना अप्रतिम उद्बोधन केलें. विविध विषयांच्या अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांचे सद्भावना, नैतिकता, व्यसनमुक्ती, संस्कार, भावात्मक विकास, होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, एकाग्रता, आत्मसात करण्याची क्षमता, आकलन क्षमता, व्यवहार ज्ञान, व्यवहार कुशलता, इत्यादी गुणांचा अंतर्भाव या पाठ्यक्रमामुळे होईल. आपल्या देशासाठी प्रामाणिक राष्ट्रप्रेमी नागरिक घडतील. शिक्षक परिषद राज्य कार्यवाह यांनी अभ्यासक्रमात जीवन विज्ञान पाठ्यक्रम समावेश करण्याबाबत राज्य कार्यकारिणी प्रयत्न करेल असे आश्वासित केले. शिक्षक परिषदेच्या वतीने हेमलता मुनोत यांनी विवेकानंद आश्रम संस्था अध्यक्ष मालपाणी सर व उपस्थित सर्व शिक्षक मार्गदर्शक संत यांच्या प्रति आभार व्यक्त केले आणि संतांच्या ऋणात राहून सदैव आशीर्वाद घेत राहू असे भाव व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी श्री कमलेश आचलिया, सुगनचंद कोटेचा, श्री सुभाषचंद्र बेदमुथा, सुदेशजी संकलेचा, डॉ.संजय व्होरा, गौतम छल्लाणी, अनघा नहार, स्वामी विवेकानंद संस्था अध्यक्ष मालपाणी सर, श्री गोरे सर व त्यांचे सर्व सहकारी आदींनी अथक परिश्रम केले.