spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या

अक्षराज : धर्मेद्र वर्पे
दि.१५, खंडाळा (सातारा) : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत डी.पी.तून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या शिरवळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या.कार सह ४ लाख ५१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त शिरवळ पोलीसांची दमदार कामगिरी
शिरवळ-केसुर्डी ता.खंडाळा गावच्या हद्दीसह शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील विविध गावांमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मालकीच्या विद्युत जनित्र (डी.पी.)तून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या शिरवळ पोलीसांनी मुसक्या आवळत चोरट्यांकडून कारसह अंदाजे ४ लाख ५१ हजार २३०.रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.यामध्ये शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. याप्रकरणी आरोपी अशपाक आव्वास खान सद्या रा.भैरवनाथ मंदिराच्या मागे कुदळवाडी, पिंपरी चिंचवड,पुणे,कांचनगंगा कानोरी बारा रोड,मोंढा जि. नागपुर मुळ रा.कोटीया ता मोहाना जि.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश याला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.


शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले ५-६ महिन्यांपासून शिरवळ, नायगाव, धनगरवाडी, केसुर्डी, भोळी यासह शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या मालकीच्या विद्युत जनित्र (डी.पी.) तून तांब्याच्या तारा चोरण्याचे प्रकार वाढत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग राहुल धस यांनी सदरील गुन्हे उघडकीस, आणण्याच्या सूचना शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे गोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार धरमसिंग पावरा ,संपत कांबळे, प्रशांत धुमाळ, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, मंगेश मोझर यांच्या पथकाने गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे सखोल तपास करुन सदरील गुन्हा हा सद्या पिंपरी चिंचवड, पुणे येथे वास्तव्यास असणारे परप्रांतीय टोळी बरोबर भोर तालुक्यातील चोरटयांनी केल्याचे तपासा अंती निष्पन्न झाले त्यानुसार शिरवळ पोलीसांनी टोळीचा प्रमुख अशपाक खान याला शिरवळ हद्दीमध्ये सापळा रचत मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळविले. यावेळी अशपाक खान याने सदरील गुन्हे हे इतर तीन साथीदारांसह केल्याचे कबूल केले आहे. त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील संबंधीत टोळीने दाखल असलेले सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. यामध्ये संबंधीत चोरटयाकडून कारसह ४ लाख ५१ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतिश आंदेलवार पोलीस अंमलदार धरमसिंग पावरा, संपत कांबळे, प्रशांत धुमाळ, विजय शिंदे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, मंगेश मोझर यांच्या पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: