अमोल कीर्तिकर यांना सिसिटीव्ही फुटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकारी यांचा नकार
अक्षराज : अजय पुजारी
दि.१५, मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या पार पडलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी चुरशीच्या लढाईत उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४८ मतानी पराजित केले होते.
अगदी थोड्या मतांनी झालेल्या या पराभवात अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे सीसीटिव्ही फूटेज देण्याची विनंती केली. यावर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जही दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदरचा अर्ज जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे पुढील निर्णयासाठी दिला होता.
मात्र अमोल कीर्तिकर याचा अर्जावर उपनगर जिल्हाधिकारी यांनी नकार दिला. हा निर्णय अमोल कीर्तिकर यांच्यासाठी धक्कादायक आहे.