spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

गोमाता, सुखी भव” समाजसेवक गोपाल भूत व राधा भूत यांनी दिला संदेश

गोमाता, सुखी भव” समाजसेवक गोपाल भूत व राधा भूत यांनी दिला संदेश

अक्षराज : सचिन ठाकूर
दि.१८, धामणगाव रेल्वे : शहरातील  समाजसेवक  भूत परिवारच्या वतीने  लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च न करता यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘गोमाते साठी, चारा उपलब्ध केला. प्राणी मात्रांवरील दया करूणा प्रेम किती आहे हे यावरुन दिसुन येते. या उपक्रमाचा तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सर्व चारा पांढरकवडा येथे दोन मिनिडोर नी गोशाळेसाठी उपलब्ध करून दिला.उन्हाळा  म्हटला की चाऱ्याचा तुटवडा पडतो यामुळे गौशाळेला मोठा प्रश्न उद्भवतो.  धामनगांव येथील समाजसेवक  गोपाल जी भूत याना भ्रमणध्वनीद्वारे पांढरकवड़ा येथिल गौशाळा येथुन  फोन आला की चारा मुबलक प्रमाणात राहिला आहे काही थोडी चाऱ्याची मदत झाली तर गोमातेसाठी बरं राहील.या  समस्येवर स्व खर्चाने धामनगांव येथून चारा घेऊन दोन मिनी डोअर पांढरकवडा येथील गौशाळेला पाठुन दिले.

या उपक्रमात राष्ट्रीय गौरक्षा मंच चे महाराष्ट्र उपाध्यक्ष हितेश गोरिया यानी मोलाचे सहकार्य केले अध्यात्मिक क्षेत्रात गौ मातेचे महत्त्व आहे, म्हणून गायीला जगाची माता मानण्यात आले आहे. ‘गवो विश्वस्य मातरः’ गायीच्या शरीरात ३३ कोटी (प्रकार) देवता वास करतात. गाय अत्यंत पूजनीय आहे. गाईंच्या रक्षणासाठी देव पृथ्वीवर प्रकटतो. जे प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत करते. प्रत्येकाने आयुष्यभर माता गायींच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. माता गाईची उपयुक्तता आणि तिच्या उपुक्तेचा विचार करता सर्वांनी एकत्र येऊन गाईला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन तिचे तन, मन आणि धनाने संरक्षण करणे आज काळाची गरज आहे. असे गोपाल भूत समाजसेवक यांनी वाटते आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: