spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

विधानसभेला १२ मतदारसंघातील राजकीय स्थिती आव्हानात्मक

विधानसभेला १२ मतदारसंघातील राजकीय स्थिती आव्हानात्मक

लोकसभा निवडणूक निकालाच्या कलाटणीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांचे वाढले “टेन्शन”

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१८, अहमदनगर : नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अहमदनगर मधील राजकारणाला कलाटणी मिळणार का याची चर्चा रंगली असून जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ मतदारसंघातील राजकारण आगामी निवडणुकीत नेमके कोणते रंग दाखवणार आणि लोकसभेचा मतदारांचा मूड कसा असणार या शंकांनी जिल्ह्यातील विद्यमान आमदारांचे टेन्शन निश्चितच वाढेल असणार आहे.
जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांपैकी शहर मध्याला संग्राम जगताप आमदार (राष्ट्रवादी अजित पवार गट) , आहेत. राहुरीला आ. प्राजक्त तनपूरे(राष्ट्रवादी शरद पवार गट ), नेवासा आ. शंकरराव गडाख ( अपक्ष, ठाकरे गट),श्रीरामपूर आ. लहू कानडे (काँग्रेस), अकोले आ. डॉ. किरण लहामटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट), संगमनेर आ. बाळासाहेब थोरात (काँग्रेस), शिर्डी आ. राधाकृष्ण विखे पाटील (भाजप), कोपरगाव आ. आशुतोष काळे ( राष्ट्रवादी अजित पवार गट), पारनेला निलेश लंके (राष्ट्रवादी), शेवगाव – पाथर्डी आ. मोनिका राजळे (भाजप), कर्जत – जामखेड आ. रोहित पवार (राष्ट्रवादी शरद पवार गट), श्रीगोंदा आ. बबनराव पाचपुते (भाजप) असे जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील सध्याचे पक्षीय बलाबल आहे.
त्यामुळे आता अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला काय गणिते असतील? शरद पवार यांची जादू २०१९ च्या विधानसभेला चाललीहोती. हीच जादू पुन्हा लोकसभेला दिसली. दरम्यान आता येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांची जादू पुन्हा चालेल का? की जिल्ह्यात विधानसभेला ‘विखे फॅक्टर’ चालेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
लोकसभेला झालेल्या पराजयामुळे विखे हे दुखावले गेले असल्याने ते विधानसभेला पूर्ण ताकदीनिशी उतरतील अशी चर्चा आहे. भाजपचे तथा महायुतीचे सर्वच आमदार निवडून आणण्याचा ते चंग बांधतील यात शंका नाही.

 नगर मतदारसंघ

नगर मतदार संघाचा जर आपण विचार केला तर सध्या आ. संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. येथे त्यांनी विखे यांना लोकसभेला पूर्ण मदत केली होती. त्यामुळे येथे विखे हे जगतापांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आपली ताकद लावतील. परंतु लोकसभेला शरद पवारांची वाढलेली सहानुभूती व महाविकास आघाडीच्या मतांच्या टक्क्यात झालेली वाढ हे मात्र त्यांची डोकेदुखी वाढवणारे ठरेल.
तसेच विधानसभेला अजित पवार गट हा नेमकी काय भूमिका घेणार ? स्वतंत्र लढणार की भाजपसोबत लढणार हे देखील पहावे लागेल. अजित पवार गट महायुतीसोबत राहिला नाही तर मात्र विखे यांची देखील येथे अडचण होईल. दरम्यान आता नगर शहरात विखे यांची पाॅवर,शरद पवार गटाचा फॅक्टर आणि अजित पवारांची आगामी वाटचाल यामध्ये जगतापांची आगामी भूमिका ठरेल.

अकोले मतदारसंघ

मागिल विधानसभेला अकोल्यात जेष्ठ नेते शरद पवार यांचाच करिष्मा दिसून आला होता. परंतु आता तेथे निवडून आलेले आमदार किरण लहामटे हेच अजित पवार गटात आहेत. तसेच तेथील दिग्गज नेते पिचड कुटुंबीयही भाजपसोबत आहे. तसेच उत्तरेतील विशेषतः अकोलेतील राजकारणात विखे यांचे वर्चस्व देखील सर्वश्रुत आहे.
त्यामुळे येथे विखे यांना महायुतीचे बळ जास्त भेटेल. त्यामुळे तेथे आता पुन्हा एकदा या विधानसभेला शरद पवार यांची जादू चालेल का ? की विखे यांचे गणित सक्सेस होईल हे आगामी काळ सांगेलच.

 कोपरगाव मतदारसंघ

कोपरगावमध्येही तीच स्थिती आहे. येथे भाजपचे मतदान देखील जास्त आहे. तसेच मागील वेळी भाजपच्या विरोधात निवडून आलेले आ. आशुतोष काळे हे महायुतीसोबत आहेत. तसेच त्यांचे व विखे यांचे राजकीय सख्य लपलेले नाही. त्यामुळे येथे शरद पवार यांना देखील कसब लावावे लागेल. दरम्यान येथे असणारे काळे – कोल्हे, विखे – कोल्हे राजकीय वैर याचा फायदा जर पवार यांनी उचलला तरी देखील काही प्रमाणात चित्र वेगळे दिसेल.

कर्जत – जामखेड मतदारसंघ

या विधानसभा मतदारसंघात विधानसभेसाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे इच्छुकांची संख्या कर्जत तालुक्यातून आमदार राम शिंदे वगळता सध्यातरी कोणाचेही नाव पुढे येताना दिसत नाही. महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रोहित पवार वगळता इतर नावांची चर्चा दिसून येत नाही. येथील मतदारसंघावर दावा ठोकण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्याही हालचाली सुरू आहेत. एकंदरीत येथे सर्वांना एकनिष्ठ ठेवण्यात महायुतीला कंबर कसावी लागेल तर महाविकास आघाडीचा एकच चेहरा असल्याने त्यांच्यात सुसूत्रता दिसेल.

 शेवगाव – पाथर्डी मतदारसंघ

शेवगाव पाथर्डीमध्ये शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे यांचे नाव जवळपास अंतिम असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून सध्या स्टँडिंग आमदार असल्याने मोनिका राजळे यांचे नाव गृहीत धरले जातेय. अजित पवार गटाकडूनही काही इच्छुक येथे आहेत. येथे लंके यांना मिळालेलं मताधिक्य पाहता शरद पवार गटाची ताकद यांचे या मतदारसंघातील प्राबल्यही मोठे आहे. तसेच या मतदारसंघात भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना मानणारा वर्गही मोठा आहे.
तसेच सध्या महायुतीसोबत असल्याची चर्चा असणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे शेवगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर यांचे वर्चस्व आहे. हि सगळी ताकद विखे यांना एकत्रित बांधण्यात यथ आले तर येथे शरद पवार गटाचेही मोठे कसब लागणार आहे यात शंका नाही.

राहुरी मतदारसंघ

राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपूरे हे शहर पवार गटाचे आमदार आहेत. येथे लोकसभेच्या मताधिक्याचा विचार करता तनपूरे यांची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसते. अर्थात येथे लोकसभेच्या मताधिक्याचा विचार करता तनपूरे यांची लोकप्रियता जास्त असल्याचे दिसते. अर्थात येथे शरद पवार यांचे देखिल व्यक्तिशः राजकीय संबंध या तालुक्याशी आहेत. आगामी विधानसभेला येथून स्वतः विखे यांच्या कुटुंबातील चेहरा येथे उभा राहील अशी चर्चा आहे.
येथे विखे यांचे कौटुंबिक स्नेह असणारे नातेवाईक जास्त प्रमाणात आहेत. तसेच राजकीय पातळीवर देखील आजवर विखे यांनी जातीने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातच आता राहुरी कारखान्याच्या माजी संचालिका स्व. रामदास धुमाळ यांच्या स्नुषा शैलजा धुमाळ यांना अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या राहुरी महिला तालुकाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. म्हणजे महायुतीची ताकद वाढलेली दिसते. त्यामुळे येथे दोन्ही गटालाही जास्तीत जास्त ताकद लावावी लागेल यात शंका नाही.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: