spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे प्रतिमेला चिखल मार आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या निषेधार्थ शहर भाजपतर्फे प्रतिमेला चिखल मार आंदोलन

अक्षराज : विकास सरवळे
दि.१९, सोलापूर : अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून त्याच्या हाताने धुऊन घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला. काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे, असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी कन्ना चौक येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन केले.

भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजयुमो अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया वड्डेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या पोस्टरला चिखल मारत बघतोस काय रागान चिखल खाल्लाय नानानं, मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद.., नाना पटोलेचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय.., धिक्कार असो धिक्कार असो नाना पटोलेचा धिक्कार असो..अशा निषेधाच्या घोषणा देऊन कन्ना चौक परिसर दणाणून सोडला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: