spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

मानपाडा पोलिसांची मोठी कामगिरी, कारमधून पडलेली दागिन्यांची पर्स पोलिसांनी दिली मिळवून…

मानपाडा पोलिसांची मोठी कामगिरी, कारमधून पडलेली दागिन्यांची पर्स पोलिसांनी दिली परत मिळवून…

अक्षराज : भानुदास गायकवाड

दि.२४, मानपाडा (ठाणे) : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला नामे कविता विंकात परब रा. रिजन्सी अनंतम, डोंबिवली पुर्व या दि.३० रोजी पनवेल ते डोंबिवली असा कारने प्रवास करीत असताना सुयोग हॉटेल जवळ, विको नाका, डोंबिवली पुर्व येथे मध्ये त्यांचे पती बसले असता कारमधील पर्स न कळत कारच्या सिटवरून खाली पडली नमूद पर्समध्ये साडेतीन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रूपये रोख रक्कम, आधारकार्ड, पॅन कार्ड, व इतर कागदपत्रे होते. नमूद पर्स महिलेच्या लक्षात आल्याने त्या न पाहता निघून गेल्या व सदरची पर्स थोड्यावेळाने एका मोटार सायकलवरील व्यक्तीने उचलल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले.

नमूद मोटारसायकल वरील व्यक्तीचा शोध नमूद सदर मोटारसायकलची पाठीमागील फाटलेली सीट, सीसीटीव्ही फुटेज, तसेच झोमॅटो कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आला व आज रोजी नमूद मोटारसायकल वरील व्यक्तीचा शोध घेतल्याने स्वीगी बॉय स्वप्निल राजू कोलार रा. दत्तनगर, डोंबिवली पुर्व त्याचे कडील साडेतीन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र, ११ हजार रूपये रक्कम व पर्स परत मिळालेली आहे. सदर कामात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिपक गडदे, पोलीस नाईक मंदार यादव, पोलीस नाईक विकास माळी, यांनी उत्तम कामगिरी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: