हरणाची शिकार माणसाने केली, गुन्हेगार मात्र कुत्रा झाला !
अक्षराज : कैलास राठोड
दि.२४, किनवट (नांदेड) : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका आणि विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैनगंगा अभयारण्य घनदाट जंगलात नुकतीच एका हरणाची शिकार करण्यात आली असून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी कुंभकरणच्या झोपेत असल्याने गावकऱ्यांना या विषयी प्रश्न पडला आहे. शिकारी आणि वन विभागात काय सट्टा बट्टा तर नाही ना ? वन्य प्राण्याची हत्या करणे हा गुन्हा असूनही हत्या व शिकार होत आहे हे माहित असताना वरिष्ठ अधिकारी गप्प का असावेत ? कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात संबंध तर नसावे ना असा संशय गावकऱ्यांमध्ये पसरला आहे. यांच्यावर कोणती कारवाई होणार का ? सदर प्रकरणाची चौकशी कोणी करणार का ? की वन विभागाचा कारभार असाच यापुढे सुरु राहणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.