spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

गावोगावी शिवसेना शाखा सुरू करणार  : विकास आण्णा शिंदे 

गावोगावी शिवसेना शाखा सुरू करणार  : विकास आण्णा शिंदे 
अक्षराज : विकास जाधव
दि.२५, वाई(सातारा) : वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यात गावोगावी शिवसेना पक्षाच्या शाखा सुरू करून गाव तेथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अभियान राबविण्यात येणार असल्याचे शिवसेना विधानसभा प्रमुख विकास आण्णा शिंदे यांनी सांगितले. याबद्दल बोलताना शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन आपल्या कार्याची छाप उमटवली आहे. त्यांचे कार्य आणि विचार गावोगावी रुजवण्यासाठी गावोगावी शिवसेना पक्षाच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने भरीव मतदान केल्यामुळे शिवसेना पक्षाचे वर्चस्व वाढले आहे असे दिसून येत आहे. भरीव शिवसेनेचे मतदान झाले आहे. त्यांचे सहकारी तालुका प्रमुख शिवसेना रवींद्र आप्पा भिलारे यांनी घर तिथे शिवसेना व गावं तिथं शिवसैनिक झाले पाहिजे, यासाठी दिवस रात्र परा कष्ट करणार व सर्वसामान्य माणसाच्या मनात शिवसेना रुजवण्याचे काम करणार असे प्रतिपादन “दैनिक अक्षराजशी” बोलताना तालुकाप्रमुख रवींद्र आप्पा भिलारे यांनी केले.
“वाई तालुक्यातील पश्चिम भागापासून शिवसेना शाखा सुरू करण्याची मोहीम”
शिवसेना शाखा ज्या गावात आहेत अशा गावांना प्राधान्याने विकास निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच शाखा मार्फत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले . शिवसेना पक्ष भविष्यात पंचायत समिती झेडपी आगामी सर्व निवडणुका स्वबळावरती लढवणार व  सक्रिय सहभाग घेणार.
– विकास आण्णा शिंदे
(शिवसेना वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा प्रमुख) 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: