दिव्यातील गटाराच्या साफसफाई संदर्भात स्वच्छता निरीक्षकांची मनसे शिष्टमंडळाने घेतली भेट
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२६, दिवा (ठाणे) : दिव्यातील गटारांच्या साफसफाई संदर्भात दिवा मनसेच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या सूचनेनसार दिवा प्रभाग समिती येथे स्वच्छ्ता निरीक्षक परदेशी यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, दिलीप गायकर, विभाग सचिव परेश पाटील, उपविभाग अध्यक्ष किरण दळवी, मनविसे शहर अध्यक्ष कुशाल पाटील, शाखाध्यक्ष सागर निकम हे पदाधिकारी उपस्थित होते.