spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

टाकळीढोकेश्वर करांनो, उघड्यावर कचरा टाकताय ? सावधान !

टाकळीढोकेश्वर करांनो, उघड्यावर कचरा टाकताय ? सावधान !

टाकळीढोकेश्वर ग्रामपंचायतचा दंडात्मक कारवाईचा निर्णय

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२६, पारनेर (अ.नगर) : टाकळीढोकेश्वर गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत आहे. मात्र, नागरिकांकडून टाकळीढोकेश्वर बायपास रोड परिसरातील रोडवर, पुला जवळ कचरा टाकणे, कचरा टाकून पळ काढणे. यांसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. कचरा टाकताना आढळल्यास सदरील व्यक्ती गावचा असो की बाहेर गावचा असो त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून त्याच्याकडून आता थेठ ५ हजार रुपये दंड होणार असल्याने कचऱ्यासंदर्भातील नियमभंग नागरिकांना चांगलाच महागात पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे ग्रामपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापन नियम दि.२३ मार्च २०१८ पासून संपूर्ण राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार कचरा वर्गीकरण न करणे, सोसायट्यांमार्फत कचरा न जिरवणे, उघड्यावर कचरा टाकणे, जाळणे अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते.
अहमदनगर – कल्याण महामार्गावर बाह्यवळण देऊन टाकळीढोकेश्वर परिसरातून महामार्ग नेण्यात आल्याने परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. तालुक्याचे मुख्य ठिकाण टाकळीढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिर, बायपास रोड शेजारी सरकारी विश्रामगृह, ग्रामीण रुग्णालय, दशक्रिया विधीघाट आहे या परिसरात सध्या कचरा डेपोचे रुप प्राप्त झाले असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना व गावातील लोकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या आगोदर देखील या भागातील साफसफाई केलेली आहे. असे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.

मात्र हळूहळू बायपास परिसरातील अनेक नागरिकांकडून फिरायला येण्याच्या बहाण्याने या भागात जाणून बुजून कचरा टाकला जात आहे.
दरम्यान,ग्रामपंचायतने या परिसरात नागरीकांना नोटीस बजावण्यात आली असून नागरिकांनी आपल्या घरातील असणारा कचरा आपल्या घरातील कचऱ्याच्या डब्यात ठेवाव्यात ठेवावा ग्रामपंचायतीची घंटागाडी आपल्या घराजवळ आल्यानंतर त्यामध्ये टाकण्यात यावा अशी नोटीस बजावण्यात आली असून नागरिकांनी या पुढील काळात ग्रामपंचायत प्रशासनास कोणत्याही व्यक्तीला कचरा टाकताना आढळल्यास सदरील व्यक्ती गावचा असो किंवा बाहेर गावचा असो त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करून त्याच्याकडून ५००० हजार रुपये दंड आकारण्यात येईल असा सावधानतेचा इशारा निवेदनात देण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कचऱ्यामुळे काकस्पर्शस प्रतिक्षा

टाकळीढोकेश्वर गावची लोकसंख्या जास्त असल्याने येथील दशक्रिया विधी घाटावर नेहमीच दशक्रिया विधी होत असतात परंतु बायपास परिसरातील मानवनिर्मित कचऱ्यामुळे येथे कावळे घरातील भाज्या, सडलेले पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्यांमधील पदार्थ खातात त्यामुळे दशक्रिया विधी घाटाकडे कवळे येत नाहित. परंतु दशक्रिया विधीवेळी कावळ्यांची काव काव ऐकण्यासाठी व आपण टाकलेल्या नैवेद्याचा घास घेण्यासाठी दशक्रिया विधी वेळी वाटत पहावी लगत असून प्रतिक्षा करावी लागत आहे. म्हणून तेथील कचऱ्यामुळे काकस्पर्श होत नाही असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: