spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्यदिव्य “राज्यस्तरीय निलरत्न पुरस्कार” सोहळा संपन्न

डॉ.निलेश राणे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्यदिव्य “राज्यस्तरीय निलरत्न पुरस्कार” सोहळा संपन्न

 

अक्षराज : प्रतिनिधी

दि.२६, थड (बुलडाणा) : थड (ता.मोताळा) येथे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा राज्यस्तरीय निलरत्न पुरस्कार-२०२४ ने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकताच ४० पुरस्कारार्थींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून धामणगांवचे पोलीस निरीक्षक नागेश गायले, वाशीम महावितरणचे कार्यकारी अधीक्षक धनंजय मिसाळ व सेवासंकल्प आश्रम पळसखेड येथील बेघर मनोरुग्ण यांचा सांभाळ करणारे डॉ.नंदकुमार पालवे यांना वैद्यकीय सेवेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यामध्ये आदर्श सरपंच, आदर्श शिक्षक, आदर्श समाजसेवक, उत्कृष्ट उद्योजक, आणि ज्यांनी १२वी व सीईटी, नीट परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून निलरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉ.निलेश राणे यांनी तसेच काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून आलेल्या सर्व पुरस्कारार्थींचे मनोबल वाढविले. हा निलरत्न पुरस्कार तुम्हाला मिळाला, यामुळे समाजामध्ये अजून आपले नावलौकिक झाले आणि पुढील कार्य जास्त जोमाने कराल अशी अपेक्षा डॉ.राणे यांनी पुरस्कार विजेते यांच्या समोर मांडली.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज जन्मस्थान,थड (ता.मोताळा) यांचे सदस्य  विजय साबळे, राजू साबळे, विशाल पाटील, अक्षय पाटील, राहुल राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.


राज्यस्तरीय निलरत्न पुरस्कार विजेते यांच्यासोबत डॉ.निलेश राणे व आयोजक विजय साबळे तसेच काही मान्यवर.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: