spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कल्याण पूर्व परिसरात दुषीत पाणीपुरवठा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !

कल्याण पूर्व परिसरात दुषीत पाणीपुरवठा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर !

अक्षराज: भानुदास गायकवाड

दि.२७, कल्याण (ठाणे) : कल्याण पूर्व परिसरात पिसवली, कोळसेवाडी या भागामधे महानगरपालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चेतन हायस्कूलच्या शेजारील साई किरण सोसायटीमध्ये  पिण्याच्या पाण्याला नाल्यातील पाण्याप्रमाणे रंग येत असून पाण्याला विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये फार भीतीचे वातावरण आहे. हे पाणी पिऊन लहान मुले, वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्तीवर काय परिणाम होईल ? असे प्रश्न नागरिक विचारत आहेत.

महानगरपालिकेची पाणीपट्टी वेळेवर भरुनही जर नागरिकांच्या आरोग्याशी असा खेळ खेळला जात असेल तर नागरिकांनी कोणाकडे जावे ? असे प्रश्न नागरिक विचारत आहे. पिण्याकरिता बिसलेरीचे पाणी आणण्याची वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ सद्या या परिसरातील नागरिकांवर आल्यामुळे महानगर पालिकेवर नागरिकांचा रोष दिसत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: