spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

बीएसपी तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

बीएसपी तर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

अक्षराज : जे.के.पोळ
दि.२६, कोपरखैरणे (नवी मुंबई) : बहुजन समाज पार्टी नवी मुंबई युनिट तर्फे लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती सेक्टर ४, कोपरखैरणे, बीएसपी कार्यालय येथे नवी मुंबई अध्यक्ष प्रा.दत्ता हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीएसपी ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव, जिल्हा प्रभारी एडवोकेट धनंजय माने, विद्याधर किरतावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईचे अध्यक्ष प्राध्यापक दत्ता हेगडे यांच्यासह उपाध्यक्ष अरविंद सिंग राव, सचिव दीपक बनसोडे, बेलापूर विधानसभेचे अध्यक्ष विनोद धुरंधर, घनसोली सेक्टर अध्यक्ष संदेश कांबळे, शुभम कांबळे, रितेश कुमार, शशांक कांबळे, परीवर्तन संस्था महिला अध्यक्ष मयुरी सावंत, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अण्णा थोरात, यावेळी यावेळी कविता भंडारे, शिंदे, लाटे, यांसह अनेक महिला उपस्थित होत्या. कोपरखैरणे मधील कार्यकर्ते जगताप, सिद्धार्थ ठोकळे, दिलीप होवाळ, सचिन जाधव यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली. ठाणे लोकसभा अध्यक्ष राजेश जैस्वार यांनी लाडू वाटप केले.
सदर कार्यक्रमास नवी मुंबई बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक व तमाम नागरिक उपस्थित होते. महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: