spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

नवीन बस स्टॉपची झाली दुर्दशा ! चोरीस गेले स्टील बेंच…

नवीन बस स्टॉपची झाली दुर्दशा ! चोरीस गेले स्टील बेंच

अक्षराज : विनोद वास्कर
दि.२८, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटी सेवेच्या बस स्टॉपची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यात बसण्यासाठी बसविलेले स्टील बेंच तुटून गेल्याने ते आता चोरीस गेले आहेत. बस स्टॉपच्या आत बसविलेल्या लाद्या तुटल्या फुटल्या आहेत. एकंदर हा नवीन बांधलेला बस स्टॉप, निकृष्ट दर्जाचा बांधल्याने त्याचा आता प्रवाशांसाठी उपयोग होताना दिसत नाही. या बस स्टॉपचा जास्त वापर कॉलेज, शालेय विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक करीत होते. आता ते सर्व उन/पावसात उघड्यावर बसची वाट पाहत असतात. एमआयडीसी मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करते वेळी जे जुने बस स्टॉप होते ते तोडले गेले गेल्याने तेथे नवीन बस स्टॉपची आवश्यकता होती.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी हे बस स्टॉप फक्त काही ठिकाणी बांधण्यात येऊन त्याचे श्रेय काही राजकीय पुढाऱ्यांनी तेव्हा घेतले होते. महत्त्वाचा असा मिलापनगर बस स्टॉप मात्र लोकांची मागणी असूनही आणि पत्र देऊनही जाणूनबुजून बांधला गेला नाही. इतरही ठिकाणी बांधलेले नवीन बस स्टॉपची अशीच कमी अधिक प्रमाणात दुर्दशा झाली असून केडीएमटी आणि केडीएमसी प्रशासनाने याची काही गॅरंटी ठेकेदार कडून घेतली होती का ? हे बस स्टॉप आता पुन्हा बांधण्यात येणार आहेत का, किंवा त्याची दुरुस्ती होणार आहे का ? निव्वळ जनतेचा पैशाची उधळपट्टी केली गेली आहे. केवळ चार महिन्यांतच या बस स्टॉपची दुर्दशा झाल्याने यात भ्रष्टाचार झाला असेल तर याची रीतसर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी. असे राजू नलावडे म्हणाले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: