spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

आंतरधर्मीय विवाहाच्या रागातून भावाने केला बहिणीच्या नवऱ्याचा खून 

येरवडा पोलीसांनी केली दोन खुनाच्या गुन्ह्यांची उकल…
अक्षराज : प्रणिल कुसाळे 
दि.०५, येरवडा (पुणे) :
आंतरधर्मीय विवाहाच्या रागातून भावाने केला बहिणीच्या नवऱ्याचा खून
येरवडा  गांधीनगर या भागातील इस्माईल शेख  याचा बहिणीने कठळू लहाने या हिंदू धर्माच्या  तरुणासोबत    आंतरधर्मीय विवाह केला होता. याच रागातून त्याने झाडाखाली बसलेल्या लहाने यांच्या वर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून केला होता. यानंतर इस्माईल हा संकेत गुप्ता याच्याबरोबर दुचाकी घेऊन  फरार झाला होता.स्थानिक   येरवडा पोलीस ठाण्यात  खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरबाबत पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांना त्यांचा बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता गुन्हयातील आरोपी नामे इस्माईल शेख व त्याचा साथीदार हे संजयपार्क येथे थांबलेले आहेत. सदर बातमी   वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा ठाणे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार    तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक  व पोलीस अंमलदार यांनी तेथे जावून  दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता इस्माईल रियाज शेख वय २३ वर्षे रा राजीव गांधी नगर येरवडा पुणे व संकेत उमेश २१ वर्षे रा राजीव गांधीनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी खुन  केल्याची  गुन्हयाची कबूली दिली.
चिखल अंगावर उडालेल्या कारणाने जबर मारहाण उपचारात मृत्यू
कस्तुरबा हौसिंग सोसायटीचे मागील नाल्यामध्ये चेंबर बांधण्याचे काम करीत असताना चिखल अंगावर उडाला म्हणून आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन दगडाने मारुन जबर जखमी केले होते म्हणून येरवडा पोलीस  ठाणे येथे मारहानीचा गुन्हा दाखल केला होता. परंतु  उपचारादरम्यान मयत झाल्याने सदर गुन्हयात भादवि ३०२ अन्वये कलमवाढ करण्यात आली होती . सदर गुन्हयातील आरोपी हे राहते घरी असल्याची माहिती तपास पथकाचे अंमलदार पोहवा दत्ता शिंदे, तुषार खराडे, कैलास डुकरे यांना मिळाली. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे यांना कळवून  यांच्या मार्गदर्शनुसार   पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटिल व तपास पथकाचे अंमलदार यांनी तेथे जावून बातमीप्रमाणे दोन इसम थांबलेले दिसून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारता प्रणव वाल्मीक अनंत्रे वय २० वर्षे रा दिघी पुणे व राज सोमनाथ परदेशी वय १९ वर्षे मु पो कुरुळी ता खेड पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हयाची कबूली दिली.
सदरची  कामगिरी येरवडा विभाग, श्री. रविंद्र शेळके, वपोनि येरवडा पो स्टे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: