spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

मुंबईत पावसाचे थैमान, रस्ते जलमय, लोकल सेवाही ठप्प…

मुंबईत पावसाचे थैमान, रस्ते जलमय, लोकल सेवाही ठप्प…

अक्षराज : विनोद वास्कर
दि. ०८, कल्याण (ठाणे) : मुंबईत मान्सूनच्या सुरुवातीला वरुण राजाने जोरदार हजेरी लावली होती. परंतु जून महिन्यात  पावसाने दांडी मारली होती. जुलै महिना सुरू होतात पावसाच्या पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची सतत धार सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची सूची करत येलो अलर्ट जारी केला होता. या अंदाजानुसार पावसाने मुंबई आणि ठाणे शहर, वाशी, दिवा, कल्याण, डोंबिवली यांनाच सुखद धक्का दिला आहे. पण मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरातील लोकांना घराबाहेर पडताना विघ्नांचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेची मेन लाईन ठाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पूर्णपणे ठप्प, या दरम्यान लाईनवर कल्याण ते ठाणे गुन्हा गतीने लोकल सेवा चालू आहेत. मध्य रेल्वेची हर्बन लाईन वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत पूर्ण ठप्प या दरम्यान हार्बर लाइनवर पनवेल ते वाशी लोकल सेवा उशिराने चालू आहेत. त्यामुळे कल्याण, वाशी, डोंबिवली, दिवा, ठाणे, मुंब्रा, या ठिकाणी प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासाकडून प्रवासांना आवाहन करण्यात आले आहे. गरज असल्यास घराबाहेर पडावे अशी रेल्वे प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे.

मुंबई पालिकेकडून १९१६ हेल्पलाईन क्रमांक जरी करण्यात आला आहे. कोणतीही आपत्ती किंवा अडचण असेल तर १९१६ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: