spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

अनधिकृत ढाबे, टपऱ्या आणि गॅरेजवर धडक कारवाई सुरूच..

अनधिकृत ढाबे, टपऱ्या आणि गॅरेजवर धडक कारवाई सुरूच..

अक्षराज : विश्वनाथ शेनोय 
दि.०८, कल्याण (ठाणे) : महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४/जे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी कल्याण (पूर्व) कोळसेवाडी परिसरातील ग्रेट कल्याण ढाबा, ढाबा डॉट कॉम व पंचायत ढाबा असे एकूण ३ ढाब्यांवर निष्कासनाची धडक कारवाई नुकतीच केली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

तसेच ९/आय व १०/ई प्रभागातही सहा.आयुक्त किशोर ठाकुर, चंद्रकांत जगताप व परिमंडळ-२ च्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी परिमंडळ-२ चे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण शीळ रोड व मानपाडा रोड या रस्त्यावरील अतिक्रमण ठरणारे फेरीवाले, टप-याधारक, दुकाना समोरील वेदरशेड व गॅरेज इत्यादींवर संयुक्तिक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई ९/आय व १०/ई प्रभागातील अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जेसीबी, १ डंपर व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: