spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

खासदार निलेश लंकेंची वडगाव सावताळ येथे उद्या पेढे तुला

खासदार निलेश लंकेंची वडगाव सावताळ येथे उद्या पेढे तुला

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१०, पारनेर (अ.नगर) : नगर दक्षिण लोकसभेचे खासदार म्हणून निलेश लंके यांची निवड झाली या निवडीचे मतदारसंघात व पारनेर तालुक्यात ठीक ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गाजदीपुर येथे खासदार निलेश लंके यांची भव्य पेढे तुला व भव्य नागरी सत्कार उद्या गुरुवार दि.११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वडगाव सावताळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, माजी सभापती सुदाम पवार, निलेश लंके प्रतिष्ठानचे मार्गदर्शक संजय लाकूडजोडे सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
निलेश लंके यांचे नगर दक्षिणचे खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल वडगाव सवताळ येथील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. त्या निमित्ताने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत निलेश लंके यांनी वडगाव सावताळ मध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. वडगाव सावताळ येथील गाजीपुर रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निलेश लंके प्रयत्न करत आहेत. निलेश लंके यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाची माहिती वडगाव सावताळचे सरपंच संजय रोकडे, माजी चेअरमन दादाभाऊ रोकडे, यांनी दिली आहे. या कार्यक्रमानिमित्ताने निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तसेच वडगाव सावताळ परिसरातील ग्रामस्थ महिलावर्ग युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: