spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

“आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” उपक्रमाची जय्यत तयारी

  “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” उपक्रमाची जय्यत तयारी
अक्षराज : विकास सरवळे
दि.११, पंढरपूर (सोलापूर) : आषाढी यात्रेकरीता दिंड्या, पालखी सोहळ्याबरोबर लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक येतात. होणार्‍या गर्दीत भाविकांचे आरोेग्य बिघडू शकते. भाविकांचे आरोग्य चांगले राहिले तर वारी आरोग्यदायी ठरणार आहे. त्यामुळेच राज्य शासनानाच्या आरोग्य मंत्रालयाने आषाढी वारीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आषाढीला येणार्‍या पालखी व दिंडीतील भाविकांना प्रस्थानापासून आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. तर पंढरीत येणार्‍या प्रत्येक वारकरी, भाविकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. याकरीता ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या महाआरोग्य शिबीर १५, १६, १७, १८ या तारखेला वाखरी,गोपाळपूर, तीन रस्ता, ६५ एकर या परिसरात महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे अशी माहीती  सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा . शिवाजीराव सावंत यांनी दिली.या शिबिरा मध्ये भाविकांची आरोग्य तपासणी,डोळ्यांची तपासणी, हृदय रोग तपासणी, रक्तक्षय तपासणी, औषधे वितरण, कान नाक घसा तपासणी, हाडांची तपासणी, दंत तपासणी, चष्म्याची वितरण, एसीजी तपासणी, रक्तगट तपासणी, सिकलसेल तपासणी अश्या आत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दि. १७ जुलै रोजी साजरा होत आहे. या सोहळ्याकरीता माऊली, तुकोबाराया यासह असंख्य पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या पालख्या, दिंड्या मजलदरमजल करत पंढरपूरला येत आहेत. पंढरीत किमान १५ ते १८ लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याअनुषंगाने भाविकांनाच्या आरोग्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यावर विशेष लक्ष ठेवून आहेत.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह मानाच्या पालखी सोहळ्या बरोबर येणार्‍या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे. यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा करण्यात येत आहे. केवळ औषधसाठाच न करता भाविकांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरणार्‍या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येत आहे. तसेच पालखी सोहळ्याबरोबर येणार्‍या दिंड्यांना सामाजिक संस्था, व्यक्ती दिंड्यातील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप करुन सेवा करण्याचा प्रयत्न करतात. वाटप करण्यात येणार्‍या अन्नाची व फळांची तपासणी देखील करण्यात येत आहे.  या महाआरोग्य शिबीराची जय्यत तयारी करताना दिसून येत आहे भैरवनाथ शुगर चे व्हा.चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महावीर नाना देशमुख, मुन्ना भोसले ,शाम गोगाव यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत.
पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी गतवर्षीपासून राज्य सरकारने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाही वारकऱ्यांना पालखी मार्गावर, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपूर येथे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी विभागाचे ६ हजार ३६८ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.
पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ असणार आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसींग, जुलाबाचा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका (बाईक अॅम्बुलन्स) तैनात ठेवण्यात येणार आहेत. कोणालाही काही त्रास झाल्यास गर्दीतही त्वरित आरोग्य सेवा देणे यामुळे शक्य होणार आहे. या फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत असणार आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य किट देण्यात येणार आहे. महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: