spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

एस.टी कर्मचाऱ्यांचे जून चे वेतन अखेर रखडले !

एस.टी कर्मचाऱ्यांचे जून चे वेतन अखेर रखडले !

अक्षराज : तृप्ती भोईर
दि.११, उरण (रायगड) : जून २०२४ या महिन्याचे वेतन देण्यासाठी एस.टी कडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. ती सरकारने रिजेक्ट केली आहे. असा दावा महाराष्ट्र एस.टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपा नंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे शासनाकडून न्यायालयात कबूल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर परिपत्रक काढताना एक वर्षाचा निधी देण्याचे परिपत्रक शासनाने प्रसारित केले. राज्य शासनाच्या चुकीच्या भुमिकेमुळे एस.टीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे जून चे वेतन अखेर रखडले आहे. त्यामुळे “उद्यापासून जो संघर्ष उभा राहिल त्याला शासन जबाबदार असेल. “असे महाराष्ट्र एस.टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: