spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

कोकण रेल्वे १३ तास उलटूनही ठप्प, प्रवाशी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अडकून पडले

कोकण रेल्वे १३ तास उलटूनही ठप्प, प्रवाशी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अडकून पडले

अक्षराज : विनोद वास्कर

दि. १५, ठाणे : जोरदार पावसामुळे खेडानजीक दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक रविवारी ठप्प झाली होती. त्यामुळे १३ पेक्षा अधिक तासांपासून कोकण रेल्वेचे प्रवासी अडकून पडले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी एक्स्प्रेस ट्रेन जागच्या जागी उभ्या आहेत. यापैकी कोचीवेल्ली एक्स्प्रेस ट्रेन गेल्या १३ तासांपासून चिपळूण स्थानकात उभी आहे. सुरुवातीला प्रवाशांना ही ट्रेन ४ तास उशिराने धावणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारची सकाळ उजाडली तरी ही एक्स्प्रेस ट्रेन चिपळूण स्थानकातच उभी आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
कोकण रेल्वेकडून गाडी चार तास उशीरा आहे, असे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर रात्रभर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता सकाळपासून मुंबईला जाण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असणारी प्रवाशांची प्रचंड संख्या पाहता एसटी बसेसची व्यवस्था कितपत पुरी पडणार, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. काल रात्रीपासून कोचीवेल्ली एक्सप्रेसमध्ये रेल्वेकडून प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी किंवा खाण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. याशिवाय, ट्रेनमधील शौचालयात पाणी नसल्याने स्त्री-पुरुष प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या सगळ्यामुळे कोकण रेल्वेचे प्रवासी प्रचंड संतापले आहेत.

                                     कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरु होणार?

खेड आणि विन्हेरे दिवाणखाटी या स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे माती रुळावर येऊन कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक कधी सुरु होणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. ताज्या माहितीनुसार, कोकण रेल्वेकडून वाहतूक ८:०० वाजेपर्यंत सुरु होईल, असे सांगितले जात होते. मात्र, प्रवाशांकडून याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अनेक एक्स्प्रेस ट्रेन या ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. त्यांना मागे किंवा पुढे जाणे शक्य नाही. त्यामुळे श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: