spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

ब्राह्मण महासंघ व संलग्न संस्था संयुक्त विद्यमाने सामूहिक श्रावणी आयोजन

ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि संलग्न संस्था संयुक्त विद्यमाने सामूहिक श्रावणी आयोजन

अक्षराज : विनोद वास्कर
दि.१८, डोंबिवली (ठाणे) : ब्राह्मण महासंघ, डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, काण्व परिषद आणि ब्राह्मण सभा, डोंबिवली) तसेच पुरोहित मंडळ (डोंबिवली पूर्व) सदस्य आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण समाज एकत्रिकरण या दृष्टीने डोंबिवली मध्ये सर्वप्रथम पुढाकार घेऊन अग्रगण्य संस्था ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे सुरु करण्यात आलेल्या सामुहिक श्रावणी कार्यक्रमाचे दुसरे वर्ष पारंपारिकरीत्या भव्यपणे हे शुक्रवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली यांचे समाज मंदिर हॉल, टिळकनगर, डोंबिवली पूर्व इथे सकाळी ६.३० पासून साजरे करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ब्राह्मण व्यक्तींनी ह्यात सहभाग घ्यावा असे आवाहन ब्राह्मण महासंघ, डोंबिवली तर्फे करण्यात आले आहे. इच्छुक व्यक्तींनी कृपया आपल्या ज्ञाती संस्थामध्ये नावे नोंदणी करावीत अथवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा !

आतापर्यंत संस्थेतर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आतापर्यंत राबवण्यात आले आहेत. जागतिक महिला दिन, समाज प्रबोधन परिसंवाद, भोंडला, स्वातंत्र्य सावरकर प्रभात फेरी, दत्तक योजना,स्वर पंचमी, अमर जवान म्युरल भेट विद्यानिकेतन शाळा, आत्मनिर्भर भारत अभियान परिसंवाद, एक पणती सैनिकांसाठी, कोविड मदत, ब्राह्मण परिषद, रक्त तपासणी आणि आयुर्वेदिक सल्ला, रक्तदान शिबिर, गुढीपाडवा, मोफत आरोग्य शबीर, मोफत आधार कार्ड आणि पोस्टाच्या विविध योजनांचा शिबिर, नवीन शैक्षणिक धोरण परिसंवाद, सामुहिक श्रावणी, EXPO भव्य ग्राहक पेठ प्रदर्शन आणि विक्री तसे अनेक उपक्रम आणि कार्यक्रम संस्थेमार्फत राबवण्यात आले आणि पुढील ही असे कार्यक्रम आम्ही राबवत राहू असे संस्थेचे अध्यक्ष मानस यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: