spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

रिक्षा चालकाची मुलगी झाली सी.ए.

रिक्षा चालकाची मुलगी झाली सी.ए.

अक्षराज : विनोद वास्कर

दि.२२, नवी मुंबई (ठाणे) : आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास धैय्य बाळगावे लागते. नुसते धैय्य बाळगून उपयोग नाही तर ते पूर्ण करण्यासाठी इच्छा शक्ती ही हवीच असते. याच इच्छा शक्तीचा प्रत्यय तळवली गावातील एका रिक्षाचालकाच्या मुलीने दाखवला आहे. आपल्या वडीलांची आर्थिक परिस्थीती बेताची पाहून तीने त्यांना बाहेर काढण्याचे ठरवले. अभ्यासाच्या जोरावर हे शक्य असल्याचे तीने हेरले. प्रचंड इच्छाशक्तीवर निकिता दिलीप पाटील हिने अभ्यासासाठी पुरेपूर वेळ देवून अखेर सीए परीक्षेत यश मिळवले.


सनदी लेखपाल (सी.ए.) ही परीक्षा देशात सर्वात कठीण समजली जाते. या परीक्षेत तळवली कोळीवाडा येथील कोळी समाजाच्या निकिता दिलीप पाटील या विद्यार्थीनीने प्रतिकुल परिस्थीतीवर मात करत यश मिळवले आहे. तीचे वडील दिलीप हिरा पाटील हे रिक्षा चालवून नवी मुंबई महापालिकेच्या तळवली गावच्या स्मशानभूमीत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. कौटुंबिक आर्थिक उर्दनिर्वाहासाठी घणसोली, ऐरोली, वाशी आणि कोपरखैरणे परिसरात रिक्षा चालवतात. निकिता पाटील हिचे १२ वी पर्यंतचे शिक्षण घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात झाले. ही लहानपणापासूनच अभ्यासू आणि हूशार आहे. निकिता हीला लहानपनापासूनच सीए व्हायचे होते. यासाठी तीने अभ्यास सुरू केला होता. परीक्षा पास होण्यासाठी रोज ती १० ते १२ तास अभ्यास करायची. याच अभ्यासाच्या जोरावर तीने हे यश मिळवले आहे. या यशाचे श्रेय तीने तीच्या घरच्यांना आणि मित्रांना दिले आहे.
तिच्या यशाबद्दल आमदार रमेशदादा पाटील, तळवली गावचे माजी नगरसेवक तानाजी पाटील, जी.एस.पाटील तसेच गावचे पोलीस पाटील रामदास पाटील आदींनी घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: