पतसंस्था व बँकांना अडचणीत आणणाऱ्या मर्दा – शेटिया टोळीचा पर्दाफाश करणार – अरुण रोडे
अक्षराज : वसंत रांधवण
दि.२७, अहमदनगर : गेल्या काही वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यातील बँका पतसंस्था डुबण्याचे सत्रच सुरु झाले आहे. त्यात नगर अर्बन बँक, दूधगंगा पतसंस्था राजे शिवाजी पतसंस्था गोरेश्वर पतसंस्था यांच्यासह इतर अनेक मल्टी स्टेट पतसंस्थांचा समावेश असून काही पतसंस्था बुडण्याच्या मार्गावर आहेत. या पतसंस्था का डबघाईस आल्या याचा बारकाईने अभ्यास केला असता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ठराविक कुटुंबांना केलेला नियमबाह्य कोट्यवधी रुपयांचा कर्जपुरवठा. अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांच्या हाती काल परवा गोरेश्वर पतसंस्थेचा ऑडिट रिपोर्ट पाहायला मिळाला त्यात ४ ते ५ कुटुंबांनाच संस्थेने जवळपास ६० कोटी रुपयांचे नियमबाह्य कर्ज पतसंस्थेने वाटले आहेत. त्यात मर्दा शेटीया छाजेड भंडारी मुळे सुराणा अगरवाल यांना जवळपास २४ कोटी रुपयांची खिरापत कर्ज वाटपाचे नियम पायदळी तुडवून गोरेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्ष बाजीराव पानमंद यांनी स्वतःच्या खिशातील पैसे वाटल्यासारखी दिसून येत आहे. त्याच बरोबर राजे शिवाजी पतसंस्था बुडविणाऱ्या पोपट ढवळे व त्याच्या बगलबच्चांना १० ते १२ कोटी दिले गेले असल्याचे समोर आले आहे.हे सगळं अशा टोळ्या जिल्ह्यात असेल तर कशा जगणार पतसंस्था. समितीचे अध्यक्ष यांनी खोलात जाऊन माहिती घेतली असता नगर मधील अनेक सहकारी बँक व मल्टीस्टेट पतसंस्थांच्या माध्यमातून बोगस कर्जप्रकरने करून देणारा सी. ए. (CA) विजय मर्दा व त्याचा साथीदार शेटीया हि नावे पुढे येताना दिसतात अर्बन बँक व शहर बँक कर्ज घोटाळ्यात मर्दा हा फरार आहे या दोघांनी या बँका संपल्यानंतर ग्रामीण भागातील संस्थाचालकांना ५ % कमिशनचे अमिश दाखवून अडचणीत आणल्याचे समजते तसेच पारनेर तालुक्यातील एका बड्या मल्टीस्टेट पतसंस्थेच्या नगर शाखेतून यांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज कमिशन देऊन उचलल्याचे समजते तसेच मर्दा याने मध्यस्ती करून अनेकजणांना नियमबाह्य पद्धतीने जवळपास १७० कोटी कर्ज फाईल कमिशन चे अमिश दाखवून करून घेतल्याचे समजते. अर्बन बँक घोटाळ्यात बाकी आरोपींना अटक होत असताना हे दोघे मात्र अजूनही बाहेर मोकाट असल्याचे दिसत आहे. लवकरच या सगळ्यांचा पर्दाफाश करण्याचे काम अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून आंदोलन करून गोर गरीब, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी यावेळी सांगितले.