spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान तर्फे स्वाक्षरी मोहीम आणि मूक मोर्चा !

आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान तर्फे स्वाक्षरी मोहीम आणि मूक मोर्चा !

अक्षराज : विनोद वास्कर
दि.०२, दिवा (ठाणे) : दि.०६ जुलै २०२४ रोजी शिळफाटा येथे गणेश घोळमंदिर परिसरात नवी मुंबई मधील अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेची ३ सेवेकरांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. २५ जुलै २०२४ रोजी उरण विभागातील यशश्री शिंदे या तरुणीवर दाऊद या आरोपीने वाईट कृत्य करून तिची हत्या केली होती. या दोन्ही घटनेत सामील असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. दिवा शहरातील लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाचा चा दबाव हवा तसा दिसत नाही. जसे नवी मुंबईत प्रकार घडलेत तसे दिवा शहरात घडू नये याची आपण खबरदारी किंवा जिम्मेदारी घ्यावी. अशी विनंती आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान दिवा आगासन तर्फे मुंब्रा पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांच्याकडे निवेद्य देऊन करण्यात आली आहे.

नवी मुंबईमध्ये घडलेल्या दोन्ही घटनेच्या आरोपींना फाशी मिळावी आणि या घटनेचा निषेधही करण्यात येणार आहे. दिवा शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात हल्ली महिलांवर अत्याचार वाढत चालले कुठेतरी ते थांबावे म्हणून जनजागृतीसाठी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान दिवा आगासन तर्फे ३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वाक्षरी मोहीम आणि ५ ऑगस्ट २०२४ रोजी मूक मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला आणि दिव्यातील महिलांनी एक तासाचा वेळ आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानला प्रतिसाद द्यावे असे आव्हान आणि विनंती आगरी महिला शक्ती प्रतिष्ठानची अध्यक्क्षा उषा मुंडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: