spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक पडघम

पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक पडघम

काका – पुतण्याच्या राष्ट्रवादीतच थेट लढत…?

अक्षराज : वसंत रांधवण
दि.०६, अहमदनगर : लोकसभा निवडणूक तत्पूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि राष्ट्रवादीकडे (अजित पवार पक्ष) यांच्याकडे असलेली पारनेर विधानसभेची जागा या पार्श्वभूमीवर पारनेर मतदारसंघात यंदाची निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात काका – पुतण्याच्या राष्ट्रवादीतच लढत होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे शरद पवार यांचे उमेदवार जिथे आहेत, तिथेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उतरविण्याची महायुतीची रणनिती असल्यामुळे या ठिकाणी अजित पवार गट विरोधात शरद पवार गटात थेट लढत होणार का? आणि भाजप अजितदादा गटासाठी हा मतदारसंघ सोडणार असा प्रश्न निर्माण असून असे झालेच तर भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता राजकीय निरिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील विधानसभेची गणिते बदलली आहेत. लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी राणीताई लंके या सर्वाधिक दावेदार राहणार आहेत. कारण निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी आपल्या विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच भावी आमदार म्हणून राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
अनेक कार्यक्रमांमधून व सोशल मीडियावरही भावी आमदार, उपाधी त्यांना जोडली गेली आहे. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लंके ह्या विधानसभेच्या मुख्य दावेदार आहेत. या मतदारसंघातून अजित पवार यांच्या पक्षाकडून सुजित झावरे, काशिनाथ दाते हेच अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता राजकीय निरिक्षकांमधून वर्तवली जात आहे. तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडे आहे. यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ दाते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, प्रशांत गायकवाड आदी नेते मंडळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, डॉ. विखे यांचा लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर पारनेर मतदारसंघातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. पराभवाचा वचपा काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. असे असले तरीही आता आगामी काळात कोणत्या पक्षाची कोणासोबत आघाडी होणार किंवा युती होणार,यावर बरेचशी गणिते अवलंबून आहेत. त्याचबरोबर आयत्या वेळी पारनेर तालुक्यातील नवीन चेहरा ही अचानक समोर येऊ शकतो. मात्र, सध्या तरी तालुक्यातील राजकारणावर एकहाती लंके यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने ते आता तालुक्यात आपल्याच पक्षाचा आमदार केल्याशिवाय राहणार नाहीत तेही तितकेच खरे आहे. मात्र याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नसले तरी येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होईल यात शंका नाही.

हे आहेत इच्छुक उमेदवार –

राणीताई निलेश लंके, प्रशांत गायकवाड, सुजित झावरे पाटील, डॉ श्रीकांत पठारे,काशिनाथ दाते सर, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात,

तालुक्यात लंकेंना १ लाख ३० हजार मते –

मागिल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांना एक लाख १७ हजार ८१ , तर जगताप यांना ८०३७२ मते पारनेर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती.
त्यावेळी विखे यांना ३६ हजार मतांची आघाडी मिळाली होती, तर यावेळी २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत झाली. यावेळी पारनेर तालुक्यात लंके यांना १ लाख ३० हजार ४४० तर डॉ सुजय विखे यांना ९२ हजार ३४० मते मिळाली. त्यामुळे यावेळी तालुक्यातील मतदारांनी पारनेरचा स्थानिक उमेदवार व विद्यमान माजी आमदार या नात्याने लंके यांना पारनेर तालुक्यातून ३८ हजार १०० मतांची आघाडी दिली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: