spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

आगरी समाजातील सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ ठाकुर यांना ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय शब्दकलारत्न पुरस्काराने सन्मानित

आगरी समाजातील सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ ठाकुर यांना ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय शब्दकलारत्न पुरस्काराने सन्मानित

अक्षराज : विनोद वास्कर

दि.०६, डोंबिवली (ठाणे) : तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे या संस्थेतर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ एकनाथ ठाकुर-खिडकाळी यांस साहित्य व कला क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय शब्दकलारत्न पुरस्कार-२०२४’ ने छ.संभाजी नगर या पावन भूमीत सन्मानित करण्यात आले. हॉटेल-छ.संभाजी नगरमधील वातानुकूलीत सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा प्रिया प्रमोद दामले यांनी २ डिसेंबर २०१५ मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. संगितकार,नाटककार,दिग्दर्शक म्हणून प्रसिध्द असलेले स्व.प्रमोद दामले यांच्या सुकन्या प्रिया दामले आपल्या वडिलांचे ध्येय पुढे घेऊन जात आहेत. साहित्य व कला क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे तसेच समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या , साहित्त्यातून समाज प्रबोधन करणाऱ्यांना ‘तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे’ या संस्थेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करायचे. अशाप्रकारे देशभरातील एकुण ४० जणांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.


ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले नवनाथ एकनाथ ठाकुर हे कवी, लेखक, निवेदक तसेच अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची पंचक्रोषित ओळख आहे. त्यांनी आत्तापर्यंत २००० हून अधिक कविता, २०० हून अधिक चारोळ्या, प्रवासवर्णने, गावांतील ऐतिहासिक वर्णन, लग्न कार्यातील विकृत हळदी-समारंभ यांवर लघू लेखांतून शाब्दिक प्रहारही केलेला आहे. त्यांचे लेखन हे समाज प्रबोधन म्हणून सर्वश्रुत आहे. नवनाथ ठाकुर हे स्वाध्याय परिवाराशी जोडलेले आहेत. नूसते जोडलेले नसून ते एक चांगले कृतीशील आहेत. परिणामी संस्कृती व धर्म यांच्याशी ते एकनिष्ठ असलेले दिसून येतात. लेखन व वक्तृत्व हे स्वाध्याय कार्यामुळेच शक्य झालेले आहे.हे नवनाथ ठाकुर यांचे ठाम मत आहे. नवनाथ ठाकुर यांनी विविध धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यासही केला आहे. गीता, रामायण, उपनिषदे तसेच विविध महान चरित्रांचाही अभ्यास केला आहे. त्यांचा अध्यात्मिक प्रवास यशस्वीपणे सुरू आहे. जीवनाकडे विधायक दृष्टिकोन ठेवून बघणे. हा त्यांचा पायंंडा आहे. २०१९ मध्ये नवनाथ ठाकुर यांना भयंकर अर्धांगवायूचा झटका आला होता. अशा भयंकर आजारावर मात करून त्यांनी त्यांचे लेखन चालू ठेवले. नवनाथ एकनाथ ठाकुर हे ‘अनुकंपा ‘आधारावर वडिलांच्या जागी जानेवारी २००१ पासून मध्यरेल्वे माटुंगा वर्कशाॕपमध्ये कार्यरत आहेत. नवनाथ ठाकुर हे कुटुंब, नोकरी, स्वाध्याय सांभाळून उर्वरीत वेळेत लेखन करत असतात. अभंग आणि अष्टाक्षरी लेखन यावर त्यांची विशेष पकड.
‘नांगर खांद्यावं घेऊनशी मी चाललो शेतावं…..’हे आगरी शेतकरी गीत व ‘दिंडी चालली दिंडी चालली’ हे गीत रेकाॕर्डिंग. ‘कधि संपून जाईल?’ कोरोना काळातील एका गीतामध्ये सह परिवार कलाकार म्हणून सहभाग.
धवलारीन….एक आगरी पुरोहित! ह्या पुस्तिकेचे लेखक नवनाथ एकनाथ ठाकुर यांनी सदर पुस्तिकेचे लिखाण करून ,आगरी, कोळी समाजातून, लग्नसमारंभातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या धवलगीतांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कृतीने प्रयत्न केले आहेत.
नवनाथ एकनाथ ठाकुर लिखित ‘धवलारिन….एक आगरी पुरोहित!’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. सदर पुस्तकाच्या काही प्रति ह्या दोन काॕलेज [म्हात्रे कॉलेज-बदलापूर व सर्वोदय कॉलेज-निळजे (डोंबिवली)] व दोन खाजगी ग्रंथालय [ठाणे ग्रंथालय व महानगरपालिका आॕफिस कल्याण] मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहित्याची विविध वर्तमान पत्रकांनीही नोंद घेतली. तसेच त्यांचा ‘काव्य इंद्रधनु’ नावाचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशीत झालेला आहे. ज्यांत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध १० कवी-कवयित्रीच्या निवडक कविता प्रकाशीत केलेल्या आहेत.
साहित्यिक प्रवासासोबत ते ‘सामाजिक बांधिलकी’ या नात्याने समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक उपक्रम राबवत असतात. या उपक्रमात मित्रपरिवार, ग्रामस्थ, सगे-संबंधी यांचे मोलाचे सहकार्य व सहभाग असतो. केवल उपदेश नाही,तर कृतीने परिवर्तन अपेक्षित.! हे नवनाथ ठाकुर यांचे तत्त्व आहे. इतकं सारं करूनही ते म्हणतात कि, आपण फक्त निमित्त असतो.
‘धन्याचा तो माल,मी त्याचा हमाल’.
अशा विविध लेखन शैलींचा विचार करून ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय,पुणे’ या संस्थेने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले साहित्यिक नवनाथ ठाकुर यांना या वर्षीचा साहित्य व कला क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय शब्दकलारत्न पुरस्कार-२०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले. नवनाथ ठाकुर यांना या अगोदर विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा त्यांना मिळालेला १९ वा पुरस्कार आहे.विविध ठिकाणी त्यांचे सन्मानही झालेले आहेत. पंचक्रोषित नवनाथ ठाकुर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: