उजनी कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पाझर तलाव भरून घ्यावेत : गणेश इंगळे
अक्षराज : प्रतिनिधी
दि.०७, सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेले उजनी धरण हे १०० % भरले आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. अजूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. अशातच पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील भिमा नदीला पूर आला असून भिमा नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच उजनी उजवा कालव्याला व उजनी डावा कालव्याला अजतागायत पाणी सोडलेलं नाही, हे दोन्हीही कालवे कोरडेच आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, माढा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या तालुक्यातील जेवढे छोटे-मोठे पाझर तलाव आहेत. ते पाझर तलाव उजनी उजव्या कालव्याला व डाव्या कालव्याला पाणी सोडून तात्काळ भरून द्यावेत अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे.