spot_img

श्री. विनोद कैलास गोरे
(दै.अक्षराज, मुख्य संपादक)
मोबा . ८६०५३१३२०२

spot_img

प्राजक्ता चव्हाण गोरे
(दै.अक्षराज, सह संपादिका)
मोबा . ९६१९१७५२७९

spot_img
spot_img

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर शीतफिने अटक !

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर शीतफिने अटक !

अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि. १४, येरवडा (पुणे) : पूर्ववैमनस्यातून वाद पेटल्यानंतर एका तरूणाला ८ ते १० जणांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडगाव शेरी भागातील नुकतीच होती. यामध्ये तरूणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून वडगावशेरी भागातील अभिषेक दत्तू राठोड (वय २२. वडगावशेरी पुणे) तरुणाचा खून करण्यात आला असून,  येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपींचा कसुन शोध सुरु केला असताना, पुणे शहरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगार अक्षरशः मोकाट सुटले आहेत. त्यामुळे नागरीक धास्तावले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वडगावशेरी भागामधील ही घटना ताजीच असताना,  या तरुणाच्या खून प्रकरणातील फरार आरोपी ओम रामचंद्र गोरे (वय २० रा. मारुती चौक, जय प्रकाश नगर, येरवडा) नगर रोड वाडिया बंगला या ठिकाणी फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट ४ पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे -४) अजय वाघमारे, यांच्या आदेशानुसार सदर ठिकाणी जाऊन फरार आरोपीस शिताफिने अटक करून येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपींचा छडा लावण्यात अखेर स्थानिक गुन्हे युनिट ४ विभागाला यश आले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: